5 हजारांची गुंतवणूक अन् वर्षाकाठी 50 लाखांची उलाढाल, मसाला व्यवसायातून महिला झाली लखपती

Last Updated:

घरासाठी म्हणून त्यांनी शेतातून आणलेल्या मिरची पासून मिरची पावडर बनवली आणि तेथूनच त्यांच्या सामान्य गृहिणी ते मसाला उद्योजक अशा नव्या प्रवासाला सुरुवात झाली. सामान्य ते गृहिणी एक मसाला व्यवसायिक होण्यापर्यंतचा मीनल यांचा प्रवास कसा झाला हे आम्ही थेट त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : कोरोना आणि त्यानंतर लागलेल्या लोकडाऊनने अनेकांच्या अर्थकारणाची चाके थांबवली. मात्र या संकटाच्या काळातही अनेकांनी व्यवसायाच्या नव्या संधी शोधल्या. त्यापैकीच एक आहेत जालन्यातील महिला उद्योजक मीनल जैद. घरासाठी म्हणून त्यांनी शेतातून आणलेल्या मिरची पासून मिरची पावडर बनवली आणि तेथूनच त्यांच्या सामान्य गृहिणी ते मसाला उद्योजक अशा नव्या प्रवासाला सुरुवात झाली. सामान्य ते गृहिणी एक मसाला व्यवसायिक होण्यापर्यंतचा मीनल यांचा प्रवास कसा झाला हे आम्ही थेट त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना शहरातील प्रयागनगर भागात मीनल परिवारा सहित राहतात. त्यांचे पती हे सूक्ष्म सिंचनाच्या व्यवसायात आहेत. कोरोना लॉकडाऊन दरम्यान अनेक जण गावी जाऊन राहण्यास प्राधान्य देत होते. तेव्हा जैद कुटुंब देखील काही दिवसांसाठी गावाकडे गेलं. तेव्हा शेतामध्ये मिरचीची लागवड केलेली होती. लॉकडाऊन असल्याने मिरचीला अत्यल्प दर मिळत होता. म्हणून त्या काही मिरची पावडर करण्यासाठी म्हणून जालन्यात घेऊन आल्या.
advertisement
या मिरची पासून पावडर तयार केल्यानंतर त्यांच्या मैत्रिणींना थेट शेतातील मिरची पासून बनवलेली ही मिरची पावडर अतिशय आवडली. यानंतर त्यांनी आणखी काही किलो मिरच्या गावाकडून आणल्या आणि जवळपास एक क्विंटल मिरची पावडर बनवली. एकाच दिवसात या मिरची पावडरची विक्री करण्यात त्या यशस्वी झाल्या. एका दिवसात एक क्विंटल मिरची पावडरची विक्री होऊ शकते तर आपण याकडे व्यवसायिक दृष्ट्या का बघू शकत नाही असा विचार त्यांच्या मनात आला आणि तेथूनच त्यांच्या व्यवसायिक जीवनाची सुरुवात झाली.
advertisement
सुरुवातीला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना 5 हजार रुपये खर्च आला. आता संपूर्ण राज्यात त्यांच्या मसाल्याची विक्री होते. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा सर्व महत्त्वाच्या शहरात जालना मसाला पोचला आहे. सुरुवातीला हळद आणि मिरची पावडर पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, मटन मसाला अशा मसाल्यांच्या वेगवेगळ्या प्रकारापर्यंत आला आहे.
advertisement
या व्यवसायातून मीनल आणि त्यांच्या कुटुंबाची व्यवसायिक भरभराट तर होत आहे. त्याचबरोबर 18 होतकरू महिलांना रोजगार मिळत आहे आणि शेतकऱ्यांच्या मिरची आणि हळद यासारख्या पिकांना चांगला दर देखील मिळतोय. पती आणि कुटुंबाची साथ मिळाली तर सर्वसामान्य गृहिणी देखील स्वतःची व्यवसायिक वाट निर्माण करू शकते हेच मीनल जैद यांनी सिद्ध करून दाखवले त्यांची ही कहाणी इतर सामान्य गृहिणींना देखील प्रेरणादायी आहे.
advertisement
सध्या माझ्याकडे  18 महिला काम करतात तर जवळपास पंधराशे एकर शेतजमिनीवरील हळद आणि मिरची शेतकऱ्यांकडून करार करून घेतली आहे. वर्षाकाठी जवळपास 50 लाखांचा टन ओव्हर आहे तर यातून 15 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळत असल्याचं मीनल जैद यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
5 हजारांची गुंतवणूक अन् वर्षाकाठी 50 लाखांची उलाढाल, मसाला व्यवसायातून महिला झाली लखपती
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement