Success Story: विविध व्यवसाय केले पण यश मिळालं नाही, पाणी पुरी सेंटरने पालटलं नशीब, आता महिन्याला 70 हजार कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
खंडूजी गोरे हे 'लाडकी बहीण' या नावाचे पाणीपुरी सेंटर चालवतात. खर्च वजा जाता महिन्याकाठी 70 ते 80 हजार रुपयांची कमाई त्यांना होते.
छत्रपती संभाजीनगर : येथील जालना रोडवरील सुंदरवाडी येथे खंडूजी गोरे हे 'लाडकी बहीण' या नावाचे पाणीपुरी सेंटर चालवतात. स्वतः एक खवय्या असल्यामुळे शहरात कुठेच हायजेनिक पाणीपुरी मिळत नाही, म्हणून माझ्या लक्षात आले की सर्व नागरिकांना हायजेनिक पाणीपुरी मिळाली पाहिजे. यापूर्वी लेबर कॉन्ट्रॅक्ट असो किंवा विद्यार्थ्यांसाठी नोकरीविषयक माहिती दिली, असे विविध व्यवसाय केले मात्र त्यात यश मिळाले नाही.
छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील सुंदरवाडी येथे हायजेनिक ऑटोमॅटिक मशीनद्वारे थंड पाण्याची पाणीपुरी सेंटर सुरू केले. सुरुवातीच्या काळात काही दिवस साधी छोटी गाडी होती मात्र व्यवसायात पदार्पण केल्यानंतर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि आज रोजी पाणीपुरी सेंटर चालवण्यासाठी हायजेनिक मशीनचा वापर सुरू आहे.
advertisement
मित्रांच्या कल्पनेतून लाडक्या बहिणींकरिता भन्नाट ऑफर आणली असून, 'लाडक्या बहिणींनो 70 रुपये द्या आणि पोट भरून पाणीपुरी खा' अशी अंमलबजावणी सध्या करत आहे. या लाडक्या बहीण पाणीपुरी सेंटरच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या दिवसात आणि रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी 3 ते 4 हजार पर्यंत दररोज मिळत असतात, त्यातून खर्च वजा जाता महिन्याकाठी 70 ते 80 हजार रुपयांची कमाई होत असल्याचे गोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
पाणीपुरी सेंटरसाठी लागणारे हायजेनिक मशीन आणि गाडी तयार करून घेण्यासाठी पूर्ण 2 लाख रुपयांपर्यंत खर्च आला असून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना पाणीपुरीची सेवा देण्यात येते. तसेच सर्व तरुणांना नोकरी मिळणे शक्य नाही त्यामुळे कुठल्याही व्यवसायाला छोटे समजू नये ज्या व्यवसायात आवड असेल तो नक्कीच करावा तसेच ज्या महिलांना पाणीपुरीची आवड आहे, त्यांनी लाडकी बहीण पाणीपुरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील गोरे यांनी केले.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
August 05, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: विविध व्यवसाय केले पण यश मिळालं नाही, पाणी पुरी सेंटरने पालटलं नशीब, आता महिन्याला 70 हजार कमाई

