Stock Market Alert: जागतिक मंदीचा धोका वाढला, 2008 सारखीच स्थिती; बाजारात क्रॅशचे काउंटडाऊन सुरू, सर्वात मोठी भविष्यवाणी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Market Shock: ग्लोबल मार्केटमध्ये वाढत्या रिस्कदरम्यान टेक सेक्टरच्या प्रचंड नफ्यावर मायकेल बरी यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. AI इन्फ्रा खर्च लपवण्यासाठी कंपन्या अकाउंटिंगचे तंत्र बदलत असल्याचा त्यांचा दावा असून बाजारासाठी हे गंभीर संकट ठरू शकते.
मुंबई: जागतिक स्तरावर शेअर मार्केटमध्ये रिस्क वाढत असल्याचा एक मोठा इशारा समोर आला आहे. टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रचंड नफा रिपोर्टनंतर हा अलर्ट दिला गेला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार मायकेल बरी यांनी इशारा दिला आहे की या कंपन्यांचा वाढता नफा गंभीर प्रश्न उभे करतो आहे. AI वर मोठ्या प्रमाणात खर्च आणि सतत वाढणारी कमाई यामुळे बिग टेक कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असला तरी त्यांच्या नफ्यात मोठा धोका दडलेला आहे, असे बरी यांनी स्पष्ट केले.
advertisement
2008 मधील हाउसिंग क्रॅशची भविष्यवाणी केलेले मायकेल बरी यांनी या वेळी मंदीचा इशारा ‘लोन’ किंवा ‘हाऊसिंग’बद्दल नसून अकाउंटिंग पद्धतींमध्ये होत असलेल्या बदलांबद्दल दिली आहे. अलीकडील सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी मेटा आणि अल्फाबेटसारख्या कंपन्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या कंपन्या सर्व्हर, चिप्स आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्चाची आयुष्यकालावधी कृत्रिमरीत्या वाढवत आहेत. त्यामुळे डिप्रिसिएशन खर्च कमी दाखवला जात आहे आणि प्रत्यक्ष कॅश फ्लो न वाढता कागदावर नफा जास्त दिसत आहे. हे अवैध नसले तरी वास्तविक ऑपरेटिंग कॉस्ट लपवण्याचा हा प्रकार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
मेटाने आपल्या कंप्यूटिंग उपकरणांची उपयुक्तता 4 वर्षांवरून 5.5 वर्षे केली आहे. या बदलामुळे कंपनीचा 2025 मधील डिप्रिसिएशन खर्च तब्बल 3 अब्ज डॉलरने कमी होणार आहे. मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट यांनीही त्यांच्या हार्डवेअरची उपयुक्तता वाढवण्याचा दावा करून असेच पाऊल उचलले आहे. खर्च कमी झाल्याने कागदावर नफा वाढला आणि त्याचा उत्साह गुंतवणूकदारांनी बाजारात दाखवला. उलट Amazon ने चिप अपग्रेडचा वेग वाढल्याचे सांगून आपल्या सर्व्हर्सचा लाइफकाळ 6 वर्षांवरून 5 वर्षे केला आहे.
advertisement
दरम्यान AI इन्फ्रास्ट्रक्चरवरील कॅपिटल एक्स्पेन्डेचर वेगाने वाढत आहे. मेटा, अल्फाबेट, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या चार दिग्गज कंपन्या पुढील 12 महिन्यांत AI संबंधित उपकरणे आणि सर्व्हर्सवर 460 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च करणार आहेत. या उपकरणांची किंमत लवकर कमी होत असल्याने हा खर्च दीर्घकाळ टिकणारा नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अल्फाबेट, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट यांनी मागील तिमाहीत 22 अब्ज डॉलरचे नुकसान दाखवले असून पुढील वर्षी हे नुकसान 30 अब्ज डॉलर पोहोचू शकते.
advertisement
तरीही ‘Magnificent Seven’ कंपन्यांचा तिसऱ्या तिमाहीतील नफा अंदाजापेक्षा जवळपास दुपटीने चांगला असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कमाईत 27% वाढ होण्याची अपेक्षा आहे. काही विश्लेषक अजूनही आशावादी आहेत, परंतु नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीफन ग्लेसर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. जर AI च्या नफ्यात जलद वाढ झाली नाही, तर या कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो.
advertisement
एकूणच बिग टेक कंपन्या कागदावर नफा चांगला दाखवत असल्या, तरी वास्तविक खर्च आणि AI गुंतवणुकीचा दबाव वाढत असल्याने बाजारासाठी पुढील काळ जास्त धोकादायक आणि अनिश्चित ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 5:18 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Stock Market Alert: जागतिक मंदीचा धोका वाढला, 2008 सारखीच स्थिती; बाजारात क्रॅशचे काउंटडाऊन सुरू, सर्वात मोठी भविष्यवाणी


