Pilot Salary in India: पायलट फर्स्ट ऑफिसर आणि क्रू मेंबरला किती मिळतो पगार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंडिगोमध्ये पायलट आणि क्रू मेंबर्सच्या पगारात मोठी वाढ असून, पायलटला वार्षिक १८ लाख ते १.२ कोटी, क्रू मेंबरला ३५ हजार ते १ लाख पगार मिळतो. सुविधाही उत्तम आहेत.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेली इंडिगो सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. गेल्या चार दिवसांत, म्हणजे २ ते ५ डिसेंबर या कालावधीत, देशभरात इंडिगोच्या हजारो फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत आणि अनेक विमाने वेळेपेक्षा खूप उशिरा धावत आहेत. या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला आहे. या समस्येसाठी क्रू मेंबर्स आणि पायलट यांची नाराजी हे एक मोठे कारण असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने प्रवाशांची जाहीरपणे माफी मागितली असून रद्द झालेल्या विमानाचे संपूर्ण पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर, एअरलाइन सेक्टरमध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाटा असणाऱ्या इंडिगोच्या पायलटांना नेमका किती पगार मिळतो? हे जाणून घेऊया.
किती असतो पगार?
जेव्हा जेव्हा देशात पायलटांच्या पगाराचा विषय येतो, तेव्हा इंडिगो एअरलाइन्स विमान उद्योगातील सर्वात आकर्षक कंपन्यांपैकी एक मानली जाते. २०२० पर्यंत, कंपनीने नवीन पायलट आणि अनुभवी कॅप्टन या दोघांसाठीही अत्यंत स्पर्धात्मक आणि फायदेशीर वेतन पॅकेज तयार करण्यात आलं होतं. पगार अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, ज्यात कामाचा अनुभव, एकूण उड्डाणाचे तास, हुद्दा आणि उड्डाण व्यतिरिक्तची जबाबदारी (उदा. नव्या पायलटांना प्रशिक्षण देणे) यांचा समावेश होतो.
advertisement
फर्स्ट ऑफिसरचा पगार
इंडिगोमध्ये फर्स्ट ऑफिसर हा फ्लाईट दरम्यान कॅप्टनसोबत काम करणारा दुसरा पायलट असतो. कॉकपिटमधील अनेक जबाबदाऱ्या सांभाळणे, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधणे आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे, ही त्यांची मुख्य कामे असतात. व्यावसायिक पायलट म्हणून करिअरची सुरुवात करणारे, तसेच ज्यांना थोडा अनुभव आहे, त्यांच्यासाठी हे पहिले महत्त्वाचे पद असते. २०२० च्या आकडेवारीनुसार, एका फर्स्ट ऑफिसरला दरमहा सुमारे १.५ लाख ते २.५ लाख रुपये पगार मिळतो, म्हणजेच वार्षिक हा आकडा १८ लाख ते ३० लाखांपर्यंत जातो.
advertisement
कॅप्टनचा पगार आणि सुविधा
सर्वात महत्त्वाचे पद असलेल्या कॅप्टनला २०२० मध्ये दरमहा ५ लाख ते १० लाख रुपये इतका मोठा पगार मिळू शकतो, म्हणजेच त्यांचा वार्षिक पगार ६० लाख ते १.२ कोटी रुपयांदरम्यान असतो. इंडिगोमध्ये पायलट असणे म्हणजे केवळ चांगली कमाई नव्हे, तर स्थिर आणि आश्वासक करिअरची संधी आहे. कंपनी आपल्या पायलटांना काम, खासगी आयुष्य आणि करिअर या तिन्ही पातळ्यांवर मदत करण्यासाठी एक संपूर्ण पॅकेज देते.ट
advertisement
क्रू मेंबरचा पगार किती असतो?
सुरुवातीला क्रू मेंबरचा पगार हा 35 हजार रुपयांच्या आसपास महिन्याला असतो. अनुभवानंतर त्यांना साधारण 60 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. हे प्रत्येक एअरलाइन्सनुसार बदलू शकतं. याशिवाय त्यांना नाइट ड्युटी आणि इतर भत्ते देखील मिळतात. आंतरराष्ट्रीय विमानांसाठी काम करणाऱ्या क्रू मेंबर्सचा पगार जास्त असतो.
वेतन आणि बोनस व्यतिरिक्तच्या सुविधा
view commentsइंडिगो केवळ भरमसाठ पगारच देत नाही, तर अनेक उत्तम सुविधाही पुरवते. यामध्ये चांगले काम केल्याबद्दल पर्फॉर्मन्स बोनस मिळतो. तसेच, पायलट आणि त्यांच्या कुटुंबीयांना इंडिगोच्या विमानांमध्ये अमर्यादित मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे त्यांचे वर्क-लाइफ बॅलन्स सुधारतो. यासोबतच, पायलटच्या कुटुंबातील व्यक्तींना पायलट बनण्यासाठी कॅडेट प्रोग्राममध्ये प्राधान्य दिले जाते, त्यांना पूर्ण आरोग्य विमा, मानसिक स्वास्थ्य सहाय्यता, तणाव कमी करण्याचे कार्यक्रम आणि मोठ्या बेसवर ऑन-साइट डेकेअरची सुविधाही मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 2:15 PM IST


