Success Story : 9 to 5 कॉर्पोरेट जॉब सोडून सुरु केला फूड स्टॉल, फक्त 7 ते 11 वेळेत त्याहून जास्त कमाई
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बीकॉम झालेल्या अनुष्काने सुरू केला स्वतःचा मस्त चमचमीत नावाने सुरमई पापलेटचा फ्रायचा व्यवसाय. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवसाय करण्याचा निर्णय
साक्षी पाटील, प्रतिनिधी प्रभादेवी : प्रभादेवीतील अनेक तरुण-तरुणी व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत, अनुष्का देखील त्यातलीच एक. बीकॉमची पदवी मिळवून कॉर्पोरेट जॉबमध्ये तीन वर्ष काम केल्यानंतर, अनुष्काने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती प्रभादेवी स्थानकापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर 'मस्त चमचमीत' नावाने फूड स्टॉल चालवते.
हा व्यवसाय सुरू करण्याआधी अनुष्का केक आणि इतर पदार्थ बनवायला शिकत होती. तिचा मित्र आदित्य ढेकरे, ज्याचे पूर्वी क्लाऊड किचन होते, त्याच्याकडून तिला व्यवसायाचे बरेच काही शिकायला मिळाले. या अनुभवाच्या जोरावर तिने स्वतःचा 'मस्त चमचमीत' फूड स्टॉल सुरू केला, जिथे संध्याकाळी सात ते अकरा पर्यंत लोकांना चमचमीत नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी मिळते.
advertisement
तिच्या स्टॉलवर बोंबील फ्राय, प्रॉन्स फ्राय, सुरमई, पापलेट, चिकन बिर्याणी असे विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतात. अनुष्काची खासियत म्हणजे सुरमई आणि खेकडे, ज्यांच्या स्वच्छतेची ती विशेष काळजी घेते. म्हणूनच, तिच्या ग्राहकांना पदार्थ नेहमीच ताजे आणि उत्तम दर्जाचे मिळतात.
अनुष्का सांगते, "कॉर्पोरेट जॉब करून पाहिला, पण व्यवसायाचं स्वप्न स्वस्थ बसून देत नव्हतं. माझ्या मस्त चमचमीत स्टॉलमधले पदार्थ विशेषत: मच्छी, स्वच्छ आणि चविष्ट असते, म्हणून लोक इथे आवर्जून येतात."
advertisement
जर तुम्हालाही चमचमीत पदार्थांची चव घ्यायची असेल, तर प्रभादेवीच्या या 'मस्त चमचमीत' स्टॉलला नक्की भेट द्या!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 24, 2024 6:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 9 to 5 कॉर्पोरेट जॉब सोडून सुरु केला फूड स्टॉल, फक्त 7 ते 11 वेळेत त्याहून जास्त कमाई










