advertisement

Success story : शिक्षणानंतर व्यवसायाला प्राधान्य, तरुण करतोय वर्षाला 40 लाख कमाई, असं काय केलं?

Last Updated:

सध्याला शिक्षण घेऊन तरुण व्यवसायकडे वळत आहेत. राहता तालुक्यातील तरुण प्रसाद लुटे हा सरकी पेंड आणि लाकडी तेल घाणा व्यवसाय करत चांगली कमाई करतोय.

+
News18

News18

अहिल्यानगर: सध्याला शिक्षण घेऊन तरुण व्यवसायकडे वळत आहेत. राहता तालुक्यातील तरुण प्रसाद लुटे हा सरकी पेंड आणि लाकडी तेल घाणा व्यवसाय करत चांगली कमाई करतोय. 2008 ला त्यांच्या वडिलांनी या व्यवसायाला सुरुवात केली. नंतर एम कॉम शिक्षण घेऊन त्याने देखील जॉब न करता हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि व्यवसायात वाढ करत आज 30 ते 40 लाख रुपये कमवतो.
2008 ला प्रसाद लुटेच्या वडिलांनी पशुखाद्य सरकी पेंड या व्यवसायाची सुरुवात ही छोट्या दुकानापासून केली होतीसुरुवातीला दहा बाय दहाच्या दुकानातून व्यवसाय उभा केलाहा दहा वर्षांचा खडतर प्रवास करून त्यांनी 2018 ला साई समर्थ ऑइल मिल या नावाने सरकी पेंडचा कारखाना चालू केलात्यात त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आलेया व्यवसायात ते सरकी पेंडचे प्रोडक्शन करतातत्यानंतर व्यवसायात वाढ करत ते तिन्ही मका भरडा, गहू भरडा, मिक्स भरडा व इतर गाईचे पशुखाद्यांचा व्यवसाय करत आज ते वर्षाला 30 ते 40 लाखापर्यंतची कमाई करत आहेत.
advertisement
प्रसाद लुटे याने 2018 ला बीकॉम झाल्यानंतर जॉब न करता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्याच व्यवसायात अजून वाढ केली. 2018 मधील त्यांनी ऑइल मिल प्रोडक्शन चालू आहेत्यात त्यांनी एकच उद्दिष्ट ठेवले होते की क्वालिटी कॉम्प्रमाईज करायचं नाहीत्यामुळे राहता परिसरात त्यांच्या गोमाता या नावाने सरकी पेंडचा ब्रँड आहेहा ब्रँड लोक नावाने खरेदी करतात.
advertisement
2018 ला मील यशस्वीरित्या चालू झाल्यानंतर 2021 मध्ये त्याने त्याचा पारंपारिक व्यवसाय लाकडी तेल घाणा सुरू केलात्यात ते शेंगदाणा तेल, करडई तेलसरकी तेल उपलब्ध करून दिले. नॉन रिफाइंड त्यांनी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले आहेयात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तेलात वाढ करत त्यांनी मोहरी तेलजवस तेल तसेच खोबरे तेलाची सुरुवात केली.
advertisement
त्यानंतर 2022 ला मका भरण्याची मशीन घेतली आणि त्यातून त्याने मका भरडागहू भरडा यांचे प्रोडक्शन चालू केले. व्यवसायात सातत्य ठेवून प्रामाणिक कष्ट केले तर व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success story : शिक्षणानंतर व्यवसायाला प्राधान्य, तरुण करतोय वर्षाला 40 लाख कमाई, असं काय केलं?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement