Upsc परीक्षेत अपशय, निराश न होता सुरू केला व्यवसाय, पुण्यातील सौरभची पाहा कहाणी, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी निराश न होता नव्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. सौरभ यांची कहाणी हे दाखवते की, एखाद्या परीक्षेत अपयश आले तरीही ते आयुष्याचं अपयश ठरत नाही.
पुणे : पुण्यातील सौरभ लोणकर यांनी यूपीएससी परीक्षेचे स्वप्न उराशी बाळगून तीन वर्षे परिश्रम घेतले. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी निराश न होता नव्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेतील अपयशाचा स्वीकार करत, त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि लिटिल चायना या नावाने थाय आणि चायनीज फूडचा स्टॉल सुरू केला.
सुरुवातीला केवळ दोन जणांच्या मदतीने सुरू झालेला हा छोटेखानी फूड स्टॉल आज 20 जणांच्या टीमपर्यंत विस्तारला आहे. सौरभ यांचा हा व्यवसाय पुण्यातील फुड लव्हर्समध्ये लोकप्रिय ठरला असून, दर्जेदार आणि स्वादिष्ट चायनीज आणि थाय खाद्यपदार्थांसाठी लिटिल चायनीज हे नाव ओळखलं जात आहे.
advertisement
सौरभ यांची कहाणी हे दाखवते की, एखाद्या परीक्षेत अपयश आले तरीही ते आयुष्याचं अपयश ठरत नाही. त्यांनी व्यवसायाची तंत्रज्ञानाधारित मार्केटिंग, ग्राहकांची पसंती समजून घेणे आणि दर्जेदार सेवा यावर भर दिला. त्याच्या चिकाटी आणि धाडसामुळे लिटिल चायनीज आज पुण्यात एक वेगळं स्थान निर्माण करू शकले आहे.
आज सौरभ यांचा व्यवसाय केवळ आर्थिक यशाचेच नव्हे तर स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीचे प्रतीक ठरला आहे. यूपीएससीच्या प्रवासातून शिकलेली शिस्त आणि मेहनत त्यांनी व्यवसायात यशस्वीपणे वापरली. सौरभ लोणकर यांची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे, जी सांगते की अपयश हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो.
advertisement
पुण्यातील कोंढावा परिसरात लिटिल चायना नावाने रेस्टोरंट असून याची सुरुवात 2019 मध्ये कलाऊड किचन च्यामाध्यमातून केली. याआधी यूपीएससीचा अभ्यास तीन वर्ष केल्यानंतर त्यामध्ये अपेक्षित असं यश न मिळाल्याने फूड संदर्भात काही तरी व्यवसाय असावा त्या उद्देशाने लिटिल चायनाचा व्यवसाय सुरु केला, असं सौरभ सांगतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 15, 2025 8:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Upsc परीक्षेत अपशय, निराश न होता सुरू केला व्यवसाय, पुण्यातील सौरभची पाहा कहाणी, Video








