Ratan Tata Successors : 24 तासांत ठरला रतन टाटांचा उत्तराधिकारी, 'या' व्यक्तीच्या हाती येणार टाटा समूहाची सूत्रे
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
दिवंगत उद्योजक रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. रतन टाटा हे अविवाहित होते. त्यामुळे टाटा समूहाची धूरा त्यांच्या पश्चात कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली होती.
Ratan Tata Successors : दिवंगत उद्योजक रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या हाती टाटा समूहाची सूत्रे येणार आहेत. टाटा ट्रस्ट बोर्डच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रतन टाटा यांच्या नावे 3800 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते. रतन टाटा हे अविवाहित होते. त्यामुळे टाटा समूहाची धूरा त्यांच्या पश्चात कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली होती.
एन. चंद्रशेखर यांनी 2017 मध्ये होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. टाटा कुटुंबातील इतर सदस्य देखील टाटा समूहातील इतर उद्योगांचे नेतृत्व करत आहेत.
advertisement
रतन टाटा यांचा वारस कोण?
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा वारस कोण होणार, त्यांची जागा कोण घेणार, या चर्चांना उधाण आले आहे. टाटा समूहाच्या उद्योग साम्राज्याची धुरा कोणाच्या हाती जाणार, याचीही चर्चा रंगली आहे. नोएल टाटा- हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांच्या पत्नी आलू या शापूरजी पालोनजी ऍण्ड कंपनीचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आहेत. आलू यांचे भाऊ सायरस मिस्त्री रतन टाटा यांचे उत्तराधिकारी बनले होते, पण नंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं.
advertisement
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. नोएल टाटा हे नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. कुटु्ंबातील सदस्य म्हणून त्यांचे नाव आघाडीवर होते. त्यानुसार आता रतन टाटा यांचे वारस म्हणून टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. टाटा ट्रस्टचे टाटा सन्समध्ये 66 टक्के शेअर्स आहेत.
advertisement
रतन टाटा यांच्या निधनानंतर फक्त उद्योगजगतच नव्हे तर सामान्य भारतीयांवरही शोककळा पसरली होती. रतन टाटा यांचे उत्तराधिकारी ठरलेले नोएल टाटा हे मागील अनेक दशकांपासून टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहातील उद्योगांशी निगडीत आहेत. त्याशिवाय सर रतन टाटा ट्रस्टचे संचालक आहेत.
सध्या नोएल टाटा हे टायटन आणि टाटा स्टील कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. त्याशिवाय टाटा समूहातील ट्रेंट कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय त्यांनी व्होल्टास कंपनीची धुरा सांभाळली आहे.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2024 1:42 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Ratan Tata Successors : 24 तासांत ठरला रतन टाटांचा उत्तराधिकारी, 'या' व्यक्तीच्या हाती येणार टाटा समूहाची सूत्रे