रेशन कार्डसाठी EKYC करण्याची शेवटची संधी, आताच करा हे काम नाहीतर कायमचं बंद होणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, रेशनकार्डसाठी ई-केवायसी कसे पूर्ण करावे? ई-केवायसीची शेवटची तारीख जाणून घ्या
मुंबई: तुम्ही अजूनही रेशन कार्डसाठी E KYC केलं नसेल तर तुमच्याकडे शेवटची संधी आहे. जर EKYC केलं नाही तर रेशन कार्ड बंद होईल. रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी! तुमच्या रेशनकार्डाचे फायदे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. भारत सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी 31 जानेवारी त्यानंतर 15 फेब्रुवारी होती, मात्र ही मुदत पुन्हा एकदा दीड महिना वाढवून देण्यात आली आहे.
अजूनही अनेक जणांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. दुर्गम भागात तर सुमारे 12 लाख रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊनच सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. जर तुम्ही वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे रेशनकार्ड रद्द होऊ शकते. याचा अर्थ तुम्हाला रेशन धान्यासह मिळणारे सर्व फायदे बंद होतील. तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुम्ही ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकता. तसेच, ऑनलाईन पद्धतीनेही ई-केवायसी करता येते.
advertisement
ऑनलाईन केवायसी कशी करावी?
1. तुमच्या राज्याच्या रेशन कार्ड किंवा सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. तुमच्या नोंदणीकृत घराच्या पत्त्याचा वापर करून लॉग इन करा. नवीन असल्यास, तुमचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून खाते तयार करा.
advertisement
3. होमपेजवर 'रेशन कार्ड सेवा' किंवा 'अपडेट तपशील' या पर्याया अंतर्गत 'ई-केवायसी' पर्याय शोधा.
4. कुटुंब प्रमुख किंवा रेशन कार्डधारकाशी जोडलेला आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधारशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय असल्याची खात्री करा.
5. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. हा ओटीपी पोर्टलवर प्रविष्ट करा.
6. पडताळणी झाल्यानंतर, तुमची ई-केवायसी अपडेट केली जाईल. पुष्टीकरण सेव्ह करा किंवा स्क्रीनशॉट घ्या.
advertisement
मोबाइल अॅपद्वारे ई-केवायसी कशी करावी?
१. 'माय रेशन २.०' हे अॅप डाउनलोड करा.
२. तुमचे तपशील प्रविष्ट करून लॉग इन करा.
३. तुमचा आधार नंबर जोडून पडताळणी पूर्ण करा.
ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड क्रमांक
advertisement
- रेशन कार्डाशी जोडलेला मोबाईल नंबर
तर वेळ न दवडता लगेचच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची ई-केवायसी करा आणि रेशनकार्डचे सर्व फायदे सुरू ठेवा, तुमच्या कुटुंबात कुणाचं EKYC झालं नसेल तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे त्यामुळे लगेच ते करुन घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 10:59 AM IST