Success Story : नोकरीसोडून घेतला धाडसी निर्णय, तरुणाचा मिसळ व्यवसाय हिट, महिन्याला 1 लाख कमाई

Last Updated:

सक्लिन मिर्झा या तरुणाने वेळेवर आणि अपेक्षित प्रगती होत नसल्याचे पाहून हातची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

+
News18

News18

नाशिक : आजच्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणारी एक कहाणी नाशिकमधून समोर आली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या आणि काही वर्षे नोकरी केलेल्या सक्लिन मिर्झा या तरुणाने वेळेवर आणि अपेक्षित प्रगती होत नसल्याचे पाहून हातची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडिलांनी सुरू केलेला राज मिसळचा व्यवसाय पुढे नेऊन सक्लिनने आज एक मोठे यश संपादन केले आहे.
नोकरीत आपलाच वेळ देऊन पैशांसाठी वाट पाहावी लागत असल्याने, सक्लिनने वडिलांच्या मिसळ व्यवसायात आपले भविष्य पाहिले.
शिक्षणाचा योग्य वापर आणि व्यवसायातील भरारी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर सक्लिनने इतरांच्या हाताखाली नोकरी केली, पण मर्यादित पगारात घर चालवताना आणि प्रगतीची गती कमी जाणवल्याने त्याने व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी सुरू केलेल्या राज मिसळला सक्लिनने आपल्या शिक्षणाचा आणि कल्पकतेचा उपयोग करून एक नवी ओळख दिली.
advertisement
वडिलांनी अत्यंत लहान स्वरूपात सुरू केलेला हा व्यवसाय आज सक्लिनने संपूर्ण नाशिकमध्ये प्रसिद्ध केला आहे. व्यवसायातील उत्कृष्ट नियोजन आणि चवीमुळे राज मिसळने अल्पावधीतच ग्राहकांना आकर्षित केले. यामुळेच, आज या तरुणाने नाशिक शहरात राज मिसळच्या दोन शाखा यशस्वीरित्या सुरू केल्या आहेत.
advertisement
रोजगार देणारा उद्योजक
सक्लिन मिर्झाच्या मेहनतीचे फळ म्हणजे, आज तो दर महिन्याला व्यवसायातून जवळपास 1 लाख रुपयांची कमाई करत आहे. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना सक्लिन सांगतो, इतरांच्या हाताखाली नोकरी करत असताना मला मिळणाऱ्या पैशांत घर चालवावे लागत होते. पण आज अशी वेळ आली आहे की, मी केवळ रोजचे पैसे कमावतोच, पण आज इतरांनासुद्धा रोजगार पुरवत आहे.
advertisement
सक्लिन मिर्झा या तरुणाची ही जिद्द आणि यशाची कहाणी, नोकरीच्या मागे न लागता आत्मविश्वासाने उद्योगात उतरू इच्छिणाऱ्या आजच्या युवा पिढीसाठी नक्कीच एक मोठी प्रेरणास्रोत ठरत आहे. तुम्हाला देखील या तरुणाच्या हातची मिसळ खायची असल्यास, नाशिक येथील ठक्कर बाजार या ठिकाणी असलेल्या डॉक्टर हाऊस या ठिकाणी राज मिसळ ही सेवेत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरीसोडून घेतला धाडसी निर्णय, तरुणाचा मिसळ व्यवसाय हिट, महिन्याला 1 लाख कमाई
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement