महाराष्ट्रातील अनोखी परंपरा, ऊस लागवड करताना केली जाते ही विशेष पुजा, काय आहे कारण? VIdeo
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये सध्या ऊस लागवडीचा हंगाम जोरात सुरू आहे. उसाची लागवड करत असताना पूजा करण्याची परंपरा आहे.
जालना : महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये सध्या ऊस लागवडीचा हंगाम जोरात सुरू आहे. उसाची लागवड करत असताना पूजा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या पूजेला वेगवेगळी नावे आहेत. काही भागात ओटी भरणे, काही भागात गणपतीची पूजा तर काही भागात गुढी उभारणे असं म्हटलं जातं.
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही पूजेने व्हावी आणि उसाचे भरघोस उत्पन्न मिळावे म्हणून देवी देवतांचे पूजन यावेळी केले जाते. ऊस लागवडी वेळी शेतामध्ये मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून पूजा करण्याची परंपरा मराठवाड्यामध्ये आहे. ही पूजा का केली जाते? यामागे लोकांच्या काय धारणा आहेत हे लोकल 18 ने जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यातील टाकरवन येथील गोविंद भुतेकर यांच्या दोन एकर शेतामध्ये उसाची लागवड सुरू आहे. ऊस लागवडीला सुरुवात करण्याआधी त्यांनी गणपतीची पूजा केली. ही पूजा करत असताना आपल्या सहचारिणीला सोबत घेतलं जातं. उसाचे पाच वाढे जमिनीत रोवले जातात. जमिनीतीलच मातीपासून गणपतीची मूर्ती तयार केली जाते. या वाड्यांच्या खोपीमध्ये गणपती ठेवून गणपतीपुढे नारळ आणि तांब्याचा घट ठेवला जातो. या घटाची आणि गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीला उसाचं चांगलं उत्पन्न यावं यासाठी साकडं घातलं जातं.
advertisement
मागील कित्येक वर्षांपासून ही परंपरा आम्ही पाळत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आम्ही जोडीने गणपतीची पूजा केली आणि भरपूर उत्पन्नाची मागणी गणपतीकडे केली. गणरायाच्या आशीर्वादाने उसाचे बंपर उत्पन्न होईल, अशी अपेक्षा असल्याचे शेतकरी गोविंद भुतेकर यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाराष्ट्रातील अनोखी परंपरा, ऊस लागवड करताना केली जाते ही विशेष पुजा, काय आहे कारण? VIdeo







