गरीबांना मदत करू नका, महागुरूचे वादग्रस्त मत; कारण ऐकून धक्का बसेल, सांगितला श्रीमंत होण्याचा नवा 'रूल'

Last Updated:

'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणुकीचा खास 'गुरुमंत्र' दिला आहे. मोठ्या क्रॅशचा इशारा देत त्यांनी सिल्व्हर, सोने आणि बिटकॉइन खरेदी करण्याचा सल्ला दिला, तसेच 'सेव्हिंग करणारे नेहमी हरतात' असे मत मांडले.

News18
News18
मुंबई : प्रसिद्ध पुस्तक ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना मोठ्या क्रॅशचा इशारा दिल्यानंतर लगेचच पैसे कमवण्याच्या आणि श्रीमंत होण्याच्या मार्गावर नवे विचार मांडले आहेत. त्यांचा हा सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
advertisement
गरीबांना पैसे न देता...
रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, माझं गरीब लोकांसाठी मन दुखतं, पण त्यांना पैसे देऊन मदत करणे मला पटत नाही. शाळेत शिकताना मिळालेला एक धडा त्यांनी शेअर केला. जर तुमच्या एखाद्या माणसाला माशी दिली, तर तुम्ही त्याला एका दिवशी खाऊ मिळवून देता. पण जर तुम्ही त्याला मासे पकडणं शिकवलं, तर तो कायमचं आपलं पोट भरू शकतो. त्यांनी गुंतवणूकदारांना नेहमी उत्पन्नाचा मार्ग दाखवण्यावर जोर दिला आहे.
advertisement
गुंतवणुकीचे मोठे गुरू
कियोसाकी यांनी सांगितलं- माझ्या श्रीमंत वडिलांचा नियम लक्षात ठेवा. फायदा आपण खरेदी करताना मिळतो, विक्री करताना नाही. त्यांनी सिल्व्हरच्या भावाबद्दलही ट्विटमध्ये उल्लेख केला. $50 हा सिल्व्हरचा टप्पा पार झाला आहे आणि पुढचं ध्येय $70 आहे. सध्याच्या भावावर गरीबांसह बहुतेक लोक सिल्व्हर खरेदी करू शकतात. मात्र एक वर्षाने भाव $200 औंसपर्यंत घावेल, तेव्हा गरीब लोक हे खरेदी करू शकणार नाहीत.
advertisement
कमी भावावर खरेदी, जास्त भावावर विक्री
कियोसाकी म्हणतात, $50 ला सिल्व्हर खरेदी करा, कारण $200 वर पोहोचल्यावर हारणारे हे खरेदी करायला धावतील. याद्या लक्षात ठेवा, हारणारे कधीच मोठ्या भावावर खरेदी करतात. म्हणून भाव कमी असताना खरेदी करा व भाव जास्त झाला की विक्री करा.
advertisement
बिटकॉइनचे उदाहरण
त्यांनी आपल्या गुंतवणुकीचे उदाहरण देताना सांगितलं की, फार कमी लोक आजच्या $100,000 भावावर बिटकॉइन घेऊ शकतात. मी माझा पहिला बिटकॉइन फक्त $6,000 ला विकत घेतला आणि आता माझ्या 100 बिटकॉइनची किंमत लाखो डॉलर झाली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
advertisement
गुंतवणूकदारांना मोठ्या क्रॅशचा इशारा
रॉबर्ट कियोसाकी हे सतत सोनं-चांदी-बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. रविवारी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी मोठ्या क्रॅशचा इशारा देतानाच सांगितलं की, मी 1971 पासून सोने घेतोय आणि अजूनही विकत नाहीये, फक्त खरेदीच करतोय. त्यांनी सांगितलं, अमेरिकेवर मोठं कर्ज आहे आणि इतिहासात इतकं कधीच नव्हतं. त्यामुळे मी क्रॅश अलर्ट देतो. 'सेव्हिंग करणारे नेहमी हारतात.' मी कायम सोनं, चांदी, बिटकॉइन, इथेरियम घेत राहतो. क्रॅश आला तरीही. कारण पुढे भरपूर पैसा येणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
गरीबांना मदत करू नका, महागुरूचे वादग्रस्त मत; कारण ऐकून धक्का बसेल, सांगितला श्रीमंत होण्याचा नवा 'रूल'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement