6 महिन्यात पैसा डबल करुन देणाऱ्या कंपनीने एका शेअरवर दिले 3 फ्री, तुम्ही घेतलाय की नाही?

Last Updated:

गुंतवणुकदारांना एका शेअरवर मिळणार तीन शेअर्स? 'या' कंपनीने निश्चित केली बोनस इश्युची तारीख

News18
News18
मुंबई : बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड ही बजाज ग्रुपमधील महत्त्वाची कंपनी आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात 1961 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. कंपनीचे नागपूर आणि आसपासच्या विविध प्लांटमध्ये जागतिक दर्जाचे इंजिनीअरिंग सेटअप आहेत. बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड गेल्या एक वर्षापासून शेअर मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत असून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. आता या कंपनीने बोनस शेअर्स देण्याचं जाहीर केलं आहे. बोनस जारी करण्याची रेकॉर्ड डेटही कंपनीने जाहीर केली आहे. बोनस जारी करण्यासाठी 12 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमती 68 टक्क्यांनी वाढल्या आहेत. Trendlyne डेटानुसार, बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडने फक्त सहा महिन्यांत गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 128 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्या गुंतवणुकदारांनी एक वर्षापासून स्टॉक होल्ड केले आहेत त्यांना आतापर्यंत 176 टक्के नफा मिळाला आहे.
बीएसईमध्ये मंगळवारी (29 ऑक्टोबर) मार्केट बंद झालं तेव्हा कंपनीचे शेअर्स 2939.65 रुपयांच्या पातळीवर होते. आदल्या दिवशी कंपनीच्या शेअर्सने 2973.70 रुपयांची पातळी गाठली होती. कंपनीची 52 आठवड्यांतील उच्च पातळी 3,499.75 रुपये आहे आणि 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी 1018 रुपये आहे.
advertisement
12 नोव्हेंबर रेकॉर्ड डेट
कंपनीने 29 ऑक्टोबर रोजी शेअर मार्केट दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, पात्र गुंतवणुकदारांना प्रत्येक एका शेअरमागे तीन शेअर बोनस म्हणून दिले जातील. कंपनीने या बोनस इश्युसाठी 12 नोव्हेंबरचा (मंगळवार) दिवस निश्चित केला आहे. बीएसई डेटानुसार, बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्यांदाच गुंतवणुकदारांना बोनस शेअर्सचं वाटप करणार आहे.
advertisement
बजाज स्टील इंडस्ट्रीजने ठराविक काळानंतर आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश (डिव्हिडंड) वाटप केलेलं आहे. कंपनीने शेवटचा एक्स-डिव्हिडंड ऑगस्ट महिन्यात दिला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर तीन रुपये डिव्हिडंड दिला होता. कंपनीने 2023 मध्ये देखील पात्र गुंतवणुकदारांना एका शेअरवर तीन रुपये डिव्हिडंड दिला होता.
ही कंपनी लेझर कटिंग मशीन आणि इतर औद्योगिक उपकरणांची निर्मिती करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. उत्पादनाच्या उच्च गुणवत्तेमुळे परदेशातील मार्केटमध्ये देखील बजाज स्टील इंडस्ट्रीजने ओळख निर्माण केलेली आहे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
6 महिन्यात पैसा डबल करुन देणाऱ्या कंपनीने एका शेअरवर दिले 3 फ्री, तुम्ही घेतलाय की नाही?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement