advertisement

लग्नात पोलिसांची एन्ट्री, नवरदेव बुलेटवरून पळाला, बीडमध्ये 100 जणांवर गुन्हा, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Last Updated:

बीड जवळील कपिलधार येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जवळील कपिलधार येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. मात्र, पोलिसांना पाहताच नवरदेवाने लग्नाच्या मंडपातून बुलेटवरून पलायन केलं. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, पोलिसांनी याप्रकरणी नवरदेवासह १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

बीड जवळील कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दुपारच्या सुमारास जेव्हा पोलीस पथक तिथे पोहोचले, तेव्हा विवाह सोहळा नुकताच पार पडला होता. मात्र, पोलिसांची गाडी आणि पथक दिसताच नवरदेवाची घाबरगुंडी उडाली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता मंडपातून बाहेर पळ काढला. तो आपल्या एका साथीदाराच्या मदतीने बुलेटवरून पळून गेला. बुलेटवरून नवरदेव पळून जात असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement

१०० जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कठोर कारवाई करण्यात आली आहे. पलायन केलेला नवरदेव, वधू-वराचे आई-वडील आणि जवळचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विवाह सोहळ्याला उपस्थित असणारी वऱ्हाडी मंडळी आणि कपिलधार देवस्थानचे विश्वस्त अशा एकूण १०० जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
advertisement
विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होण्याची पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात अनेकदा बालविवाह लावण्याचे प्रकार उघडकीस आले होते. असे बालविवाह रोखण्यासाठी पोलीस आणि सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने असे विवाह लावले जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस फरार नवरदेवाचा शोध घेत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नात पोलिसांची एन्ट्री, नवरदेव बुलेटवरून पळाला, बीडमध्ये 100 जणांवर गुन्हा, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement