US फेडकडून नवे व्याजदर, शेअर मार्केटवर होणार परिणाम, कसा असेल आजचा दिवस?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ट्रम्प म्हणाले की पॉवेल आणि फेड महागाईचा सामना करण्यात अपयशी ठरले. व्याजदरात कपात न झाल्याने अमेरिकन मार्केटमध्ये मोठी निराश पाहायला मिळाली. अमेरिकन बाजार अर्ध्या टक्क्याने घसरले.
मुंबई: फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले की ते महागाई 2 टक्क्यांवर ठेवण्याशिवाय तूर्तास कोणताही पर्याय नाही. सध्या फेड वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे ट्रम्प सध्या रणनिती ठरवत असून त्याचा अवलंब येत्या काळात करणार आहेत. ट्रम्प म्हणाले की पॉवेल आणि फेड महागाईचा सामना करण्यात अपयशी ठरले. व्याजदरात कपात न झाल्याने अमेरिकन मार्केटमध्ये मोठी निराश पाहायला मिळाली. अमेरिकन बाजार अर्ध्या टक्क्याने घसरले.
वोल्टसला मोठा फायदा
तिसऱ्या तिमाहीमध्ये वोल्टस कंपनी तोट्यातून नफ्याकडे जाताना दिसत आहे. रिकव्हरि मोड चांगला असून तिमाहीचे निकाल चांगले आले आहेत. वोल्टास कंपनीच्या रेवेन्यूमध्ये 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्जिनमध्ये वेगानं तेजी आल्याचं दिसलं. SRF चा नफा 7 टक्क्यांनी वाढ दिसत आहे.
टाटा मोटर्सचे शेअर्स आपटले
टाटा मोटर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत होते. कंपनीचा नफा 22% ने कमी झाला. जेएलआरचा रेवेन्यू स्थिर राहिला. मार्जिनवरही दबाव होता. 2025 मध्ये नफा मिळवण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे चौथ्या तिमाहीमध्ये नेमकं काय होतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.
advertisement
बजाज फायनान्सला अच्छे दिन
बजाज फायनान्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले होते. नफ्यात 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. व्याजातून मिळणारे उत्पन्नही 22.5 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 26 साठी नफ्यात 22 ते 23 % वाढ आणि AUM मध्ये 25 % वाढ होईल अशी ग्रोथ गाइडलाईन दिली आहे.
advertisement
निफ्टी 50 चे संकेत काय सांगतात?
निफ्टी 50 चे संकेत सध्या भारतीय शेअर मार्केटची सुरुवात फ्लॅट होईल असे संकेत देत आहेत. मार्केटवर दबाव असणार आहे. 1 फेब्रुवारीला बजेट आहे. आज मंथली क्लोजिंग देखील असणार आहे. त्यामुळे शेअर मार्केटची स्थिती ना नफा न तोटा अशी पहिल्या सत्रात राहू शकते. फ्लॅट सुरू राहील. पहिल्या सत्रानंतर काही बदल होतात का पाहावं लागणार आहे.
advertisement
1 फेब्रुवारीला बजेट
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत. या बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये पुन्हा रिकव्हरी येऊ शकते अशी तज्ज्ञांना आशा आहे. त्यामुळे आता पैसे गुंतवण्याची घाई करू नये, बजेटपर्यंत थोडं थांबावं असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
US फेडकडून नवे व्याजदर, शेअर मार्केटवर होणार परिणाम, कसा असेल आजचा दिवस?