advertisement

सलग पाचव्या सत्रातही घसरण सुरूच, 12 फेब्रुवारीला कशी असेल बाजाराची दिशा, जाणून घ्या...  

Last Updated:

Share Market: सलग पाचव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण झाली.

शेअर मार्केट ग्राफ (एआय फोटो)
शेअर मार्केट ग्राफ (एआय फोटो)
आज मंगळवारी, सलग पाचव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. 11 फेब्रुवारीला निफ्टी 23,100 च्या खाली बंद झाला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स 1,018.20 अंकांच्या घसरणीसह 76,293.60 वर आणि निफ्टी 309.80 अंकांनी घसरून 23,071.80 वर बंद झाला. आज सुमारे 516 शेअर्स वधारले, 3330 शेअर्स घसरले आणि 92 शेअर्स स्थिर राहिले. निफ्टीतील अपोलो हॉस्पिटल्स, आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले. अदानी एंटरप्रायझेस, ट्रेंट, भारती एअरटेल आणि ग्रासिम इंडस्ट्रीज यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले.
ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस, एनर्जी, एफएमसीजी, हेल्थकेअर, पॉवर, पीएसयू आणि रियल्टी हे सर्व सेक्टोरल इंडेक्स 2 ते 3 टक्क्यांनी घसरले. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 3 टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण दिसून आली.
प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले, ‘संथ सुरुवातीनंतर बाजारातील बेअर्सनी दमदार पुनरागमन केले. आज संपूर्ण बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एकदा तर निफ्टी 23,000 च्या सायकॉलॉजिकल सपोर्टच्या खालीही गेला होता. पण शेवटी तो काहीसा सावरला आणि 309.80 अंकांच्या घसरणीसह 23,071.80 वर बंद झाला. सर्व सेक्टर लाल रंगात बंद झाले. यामध्ये रियल्टी आणि मीडियामध्ये सर्वाधिक घसरण दिसली.’
advertisement
‘ब्रॉडर मार्केटमधली विक्री पाहून खरंच वाईट वाटलं. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स अनुक्रमे 3.02 टक्के आणि 3.45 टक्क्यांनी घसरले. बाजारातील टेक्निकल डाटाची परिस्थिती कमकुवत आहे, प्रत्येक उसळीवर विक्रीचा दबाव वाढत आहे. इंडेक्स या आधीच्या 22,800 या सपोर्टपर्यंत जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असं दिसतंय. जर निफ्टीने ही लेव्हल तोडली तर तो 22,600 पर्यंत खाली जाऊ शकतो. वरच्या दिशेला तर, 23,240 या लेव्हलवर लगेच रेझिस्टन्स दिसतो आहे,’ असंही गग्गर यांनी सांगितलं.
advertisement
जिओजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले, ‘ बाजाराचं सेंटिमेंट कमकुवत होण्यासाठी अमेरिकेची ट्रेड पॉलिसी, टेरिफबद्दलची अनिश्चितता, देशांतर्गत आर्थिक वाढीची चिंता आणि एफआयआयकडून सातत्याने होत असलेली विक्री ही महत्त्वाची कारणं आहेत. मागणीसंबंधी असलेली चिंता आणि हाय व्हॅल्युएशनमुळे मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपया कालच्या विक्रमी नीचांकी पातळीवरून काहीसा सावरला आहे. पण तो दडपणाखाली आहे. नजीकच्या भविष्यात बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. ट्रेडमधील अनिश्चिततेतून सुटका करून घेण्यासाठी गुंतवणुकदारांचं लक्ष पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याकडे लागलं आहे. त्या दौऱ्यातील निर्णयांमुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. अमेरिकेती महागाईसंबंधी आकडेवारीवरही बाजाराचं लक्ष असेल.’
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
सलग पाचव्या सत्रातही घसरण सुरूच, 12 फेब्रुवारीला कशी असेल बाजाराची दिशा, जाणून घ्या...  
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement