Penny Stock: 2 रुपयांचा शेअर पोहोचला 60 वर, 4 वर्षांत दिले तिप्पट रिटर्न

Last Updated:

एका कंपनीनं तर गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल केलं आहे. या कंपनीने ग्राहकांना 2 रुपयांच्या स्टॉकचे 60 रुपये दिले.

News18
News18
Multibagger Penny Stock: आजकाल फिक्स डिपॉझिट किंवा इतर स्कीमपेक्षा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून लोक जास्त रिटर्न्स मिळवण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. एका कंपनीनं तर गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल केलं आहे. या कंपनीने ग्राहकांना 2 रुपयांच्या स्टॉकचे 60 रुपये दिले. 4 वर्षांत जवळपास तिप्पट रिटर्न दिलं आहे. तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोमध्ये हा शेअर अॅड केला आहे का कोणती कंपनी आहे त्याबाबत जाणून घेऊया.
शेअर बाजारातील काही शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीतच खूप जास्त रिटर्न्स देतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणारी प्रत्येक व्यक्ती अशा मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या शोधात असते. असाच एक शेअर स्मॉल कॅप कंपनी वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडचा आहे. वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत चांगली वाढ झाली.
हा पेनी स्टॉक 4 वर्षांपूर्वी 1.91 रुपयांवर होता, जो मंगळवारी (3 डिसेंबर) प्रति शेअर 59.11 रुपयांवर पोहोचला. चार वर्षांत त्यात 3000 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक चार वर्षांत 30 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. वन पॉइंट वन सोल्युशन्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 77.50 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची कमी किंमत 44.65 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1509 कोटी रुपये आहे.
advertisement
वन पॉइंट वन सोल्युशन्स शेअर किंमत इतिहास
वन पॉइंट वन सोल्युशन्सच्या शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, गेल्या 3 वर्षात त्यांनी 489.92 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात 13.24 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी 16.47 टक्के वाढ झाली आहे.
कंपनी काय करते
हे उल्लेखनीय आहे की वन पॉइंट वन सोल्युशन्स ही बीपीएम क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएफएसआय, रिटेल, न्यू एज आणि फिनटेक डोमेनमध्ये ग्राहकांना सेवा पुरवते. या कंपनीची स्थापना 2006 साली झाली.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Penny Stock: 2 रुपयांचा शेअर पोहोचला 60 वर, 4 वर्षांत दिले तिप्पट रिटर्न
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement