Share Market: PNB, BOB 2 बँकांच्या शेअर्ससाठी चढाओढ, का खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Last Updated:

बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी आली आहे. बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 25-30% परतावा मिळण्याची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई: बजेटनंतर शेअर मार्केटला अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळत आहे. रिकव्हरी मोडवरुन मार्केट आता हिरव्या रंगात व्यवहार करत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. तिमाहीचे निकाल हाती आले आहेत. बजेटनंतर 2 बँकांच्या स्टॉक्सची खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठी चढाओढ सुरू झाली आहे. तज्ज्ञांनी हे शेअर्स खरेदी करण्यासाठी स्पर्धा का सुरू झालीय याचं कारण सांगितलं आहे.
ब्रोकरेज हाऊसने बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेसाठीचे शेअर खरेदी करण्याबाबत सल्ला दिला आहे. शेअरखान यांनी बँक ऑफ बडोदामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. मोतीलाल ओसवाल यांनी पंजाब नॅशनल बँकेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमधून 25-30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
बँक ऑफ बडोदा
advertisement
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, बजेट सादर झाल्यानंतर शेअरखानने बँक ऑफ बडोदामध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली. शेअरखानने स्टॉकसाठी 280 रुपयांचं टार्गेट दिलं. आज या शेअरच्या किमतीमध्ये चांगली वाढ झाली. मंगळवारच्या सत्रात त्याने इंट्राडे 214.5 रुपयांचा उच्चांक गाठला होता. म्हणजेच इथून हा स्टॉक 30 टक्क्यांहून अधिक परतावा देईल अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, तिसऱ्या तिमाहीचे आकडे मिश्रित आहेत. कर्ज खर्चात घट झाल्यामुळे उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, बँकेच्या कामगिरीचा विचार करता व्हॅल्यूएशनची स्थिती चांगली आहे. त्यामुळे येत्या काळात हा स्टॉक चांगले रिटर्न्स देईल.
advertisement
पंजाब नॅशनल बँक
मोतीलाल ओसवाल यांनी पंजाब नॅशनल बँकेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. अर्थसंकल्पानंतरच्या गुंतवणूक सल्ल्यामध्ये, ब्रोकरेज हाऊसने स्टॉकसाठी 125 रुपयांचे टार्गेट दिलं आहे. हा शेअर सध्या 100 रुपयांवर व्यवहार करत आहे. याचा अर्थ असा की येथून स्टॉक 25 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजच्या मते, बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल मजबूत राहिले आहेत. RoA मधील मार्जिन आणि स्थिरतेतील चांगले संकेत पाहता, ब्रोकरेज फर्मने रिस्क आहे मात्र चांगले रिटर्न्स मिळतील अशी आशा व्यक्त केली आहे.
advertisement
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: PNB, BOB 2 बँकांच्या शेअर्ससाठी चढाओढ, का खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement