फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! प्रसिद्ध अभिनेत्री, डायरेक्टर, संगीतकारसह 8 जणांना अटक; सिनेसृष्टीत खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actress Arrested In Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्यामुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
फिल्म इंडस्ट्रीत एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. याप्रकरणी एक प्रसिद्ध अभिनेत्री, डायरेक्टर, संगीतकारसह 8 जणांचा अटक करण्यात आली आहे, त्यामुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
अँटी-नार्कोटिक्स इंटेलिजेंस युनिटने चेन्नईमध्ये एका नवीन ड्रग्ज प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेसापक्कम परिसरातून 33 वर्षीय विघ्नेश्वरनला अटक करण्यात आली तेव्हा संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. चौकशीदरम्यान त्याने पोरूरजवळील कोवर परिसरातील रहिवासी व्यंकटेश कुमार यांच्याकडून ड्रग्ज खरेदी केल्याचं सांगितलं. या माहितीच्या आधारे एएनआययू टीमने प्लॅन करून एक बनावट ऑपरेशन राबवलं.
advertisement
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक असल्याचं भासवून व्यंकटेश कुमारशी संपर्क साधला. त्याची गाडी वलसारवक्कममधील एका प्रमुख ठिकाणी येताच पथकाने त्वरित कारवाई केली. त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.
शोध मोहिमेदरम्यान,पोलिसांनी आरोपींकडून मेथाम्फेटामाइन, एलएसडी स्टॅम्प, एलएसडी आणि गांजा यासह अनेक वस्तू जप्त केल्या. एक स्मोकिंग बोंग आणि अनेक मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले, जे तपासासाठी महत्त्वाचे मानले जातात.
advertisement
अटक केलेल्यांमध्ये दक्षिण भारतातील अनेक प्रमुख कलाकारांचा समावेश आहे. कार्तिक राजा, यशवंत, श्रीराम, अल्विबिंशा, विन्सी निवेथा आणि अंजू कृष्णा यांच्यासह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली.
कार्तिक राजा हा तामिळ फिल्ममधील संगीतकार तर विन्सी निवेथा सहाय्यक दिग्दर्शक आहे. अंजू कृष्णा ही अभिनत्री आहे. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली. नंतर वेल्लीमलाई या तमिळ चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. ती तमिळ तसंच मल्याळम चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे.
advertisement
सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या कारवाईमुळे चित्रपट उद्योगात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितलं की तपास सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत या नेटवर्कशी संबंधित आणखी नावं समोर येऊ शकतात.
Location :
Tamil Nadu
First Published :
Feb 06, 2026 11:24 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! प्रसिद्ध अभिनेत्री, डायरेक्टर, संगीतकारसह 8 जणांना अटक; सिनेसृष्टीत खळबळ









