Share Market: Power Stock कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत, 8 दिवसात पैसे दुप्पट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Stock Market Power Share: मार्केटतज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत हा शेअर आणखी वाढेल आणि 60 रुपयांचा आकडा पार करेल.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये एका इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन कंपनीची जोरदार चर्चा आहे. 'रिलायन्स पॉवर' असं या कंपनीचं नाव असून ती अनिल अंबानी यांच्या मालकीची आहे. अनेक दिवसांपासून या कंपनीचे शेअर सतत फोकसमध्ये आहेत.
कंपनीच्या शेअर्सनी गेल्या आठवड्यात सलग 5 टक्क्यांचं अप्पर सर्किट गाठलं आहे. शुक्रवारी (27 सप्टेंबर) शेअर 46.36 रुपयांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. हा शेअर आठ दिवसांत 32 रुपयांवरून 45 टक्क्यांनी वाढला आहे. मार्केटतज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत हा शेअर आणखी वाढेल आणि 60 रुपयांचा आकडा पार करेल.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्सचा बीटा 0.9 आहे. तो एका वर्षातील अत्यंत कमी अस्थिरता दर्शवतो. स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांचं मूव्हिंग अव्हरेज ओलांडून ट्रेड करत आहे. रिलायन्स पॉवरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) 83.1 वर आहे. यातून सूचित होतं की, हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेडिंग करत आहे.
advertisement
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्सच्या किमती आणखी वाढू शकतात. कंपनीचे शेअर्स 58 ते 62 रुपयांच्या रेंजमध्ये पोहोचू शकतात.
रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल रिसर्च) रवी सिंग यांच्या मते, रिलायन्स पॉवरमध्ये येत्या काही दिवसांत 50 रुपयांची किंमत गाठण्याची क्षमता आहे. कोणतीही व्यक्ती काउंटरवर 40 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवू शकते.
advertisement
आनंद राठी फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि टेक्निकल रिसर्च अॅनॅलिस्ट जिगर एस. पटेल यांच्या मते, जर हा शेअर 45 रुपयांच्या वर गेला तर तो 48 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हा स्टॉक अल्प मुदतीसाठी 40 ते 48 रुपयांच्या कॅटेगरीत ट्रेड करेल. सेबी-रजिस्टर्ड रिसर्च अॅनॅलिस्ट ए. आर. रामचंद्रन यांनी गुंतवणूकदारांना प्रॉफिट बुकिंगचा सल्ला दिला आहे.
advertisement
सातत्याने कर्ज कपातीचे निर्णय घेतल्याने रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनी झपाट्याने कर्जमुक्त होत आहे. अलीकडेच, रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या रोजा पॉवरने सिंगापूरमधील कर्जदार वर्डे पार्टनर्सला 850 कोटी रुपयांच्या कर्जाचं प्रीपेमेंट करण्याची घोषणा केली आहे.
या पूर्वी, रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरसाठी गॅरेंटरशी संबंधित 3,872 कोटी रुपयांच्या देणेदारीची पूर्तता झाली आहे. कंपनीला लिलावाद्वारे रिलायन्स पॉवरकडून 500 मेगावॅट बॅटरी स्टोरेजचं कंत्राटही मिळालं आहे. याशिवाय कंपनी निधी उभारण्यावरही भर देत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2024 2:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: Power Stock कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत, 8 दिवसात पैसे दुप्पट