छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बचत गटांना शेतीच्या कामातून आर्थिक प्रगती साधता यावी, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व अवजारे वाटपाची योजना सुरू झाली असून, यामध्ये साडेतीन लाखांपर्यंतच्या खर्चावर सरकार तब्बल 90 टक्के रक्कम स्वतः भरणार आहे.



