advertisement

हॅपी स्कूल! कॅनडाच्या नागरिकांना जालन्यातील झेडपी शाळेची भुरळ, दिली खास भेट

Last Updated:

या शाळेतील नवोपक्रमाची कॅनडातील नागरिकांनी दखल घेतली आहे. या शाळेला कॅनेडियन नागरिकांनी भेट देऊन उपक्रमांबाबत जाणून घेतले.

+
झेडपी

झेडपी

जालना : जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर विदारक चित्र उभं राहतं. परंतु जालना जिल्ह्यातील नजीक पांगरी येथील जिल्हा परिषद शाळा ही खाजगी शाळेला लाजवेल अशी आहे. या शाळेतील नवोपक्रमाची कॅनडातील नागरिकांनी दखल घेतली आहे. या शाळेला कॅनेडियन नागरिकांनी भेट देऊन उपक्रमांबाबत जाणून घेतले.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी गावातील जिल्हा परिषद शाळा सध्या चर्चेत आहे. या शाळेने हॅपी स्कूल उपक्रमांतर्गत ग्रामीण शिक्षणात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट सेव्हिंग बँक, किचन गार्डन आणि सेंद्रिय खत प्रकल्प, आधुनिक कॉम्प्युटर लॅब, कोडिंगसारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जातात. या सर्व नवीन उपक्रमांमुळे कॅनडामधून आलेले रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय पाहुणे या शाळेला भेट देण्यासाठी विशेषतः पांगरी येथे पोहोचले.
advertisement
त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि शाळेत होत असलेल्या शैक्षणिक बदलांची खुल्या मनाने प्रशंसा केली. ग्रामीण भागातील शिक्षणासाठी असा सामाजिक सहभाग खरोखरच प्रेरणादायी आहे. यामुळे वेगवेगळ्या देशांच्या शिक्षण पद्धती, संस्कृती आणि विचारसरणी समजण्याची संधी मिळते. तसेच हे जगातील शांततेकडे एक सकारात्मक पाऊल ठरते, असं एका कॅनेडियन नागरिकाने सांगितलं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/जालना/
हॅपी स्कूल! कॅनडाच्या नागरिकांना जालन्यातील झेडपी शाळेची भुरळ, दिली खास भेट
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement