Share Market updates : बजेटआधी Defence Stock खरेदी करण्यासाठी चढाओढ, किंमतही चक्क 150 रुपयांपेक्षा कमी

Last Updated:

अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअर्समध्ये DRDO कडून मोठा ऑर्डर मिळाल्यामुळे 6% वाढ झाली आहे. कंपनीला 7.37 कोटींचा ऑर्डर मिळाला असून शेअरची किंमत 125.80 रुपयांवर पोहोचली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
मुंबई: डिफेन्स क्षेत्रातील एका महत्वाच्या कंपनीचे शेअर्स सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. डिफेन्सचे शेअर्स साधारण एक हजार रुपयांच्या आसपास किंवा त्याहून जास्तच आहेत. मात्र असा एक शेअर आहे जो खरेदी करण्यासाठी बजेटआधी मार्केटमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. हा शेअर कोणत्या कंपनीचा आहे आणि एवढी स्पर्धा या एका कंपनीच्या शेअर्ससाठी का आहे जाणून घेऊया.
अपोलो मायक्रो सिस्टिम्स (Apollo Micro Systems) या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स 29 जानेवारी रोजी BSE वर 6% नी वाढले, आणि शेअरची किंमत 125.80 रुपयांवर पोहोचली. या वाढीमागचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीला DRDO कडून मोठा ऑर्डर मिळाला आहे.
कंपनीला मिळाले तगडे संरक्षण क्षेत्राचे ऑर्डर
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार अपोलो मायक्रो सिस्टिम्सने 28 जानेवारी रोजी शेअर बाजार नियामकांकडे माहिती दिली की संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) कडून 7.37 रुपयांची कोटींचा ऑर्डर मिळाला आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.
advertisement
नोव्हेंबर 2023 मध्ये देखील कंपनीला DRDO कडून ऑर्डर मिळाली होती. 22 नोव्हेंबर 2023 रोजी DRDO आणि अदानी ग्रुपकडून 4.65 कोटींची ऑर्डर मिळाली होती. 3 डिसेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि एका खाजगी कंपनीकडून 21.42 कोटींची ऑर्डर मिळाली.
शेअरची कामगिरी आणि गुंतवणुकीची संधी
2024 मध्ये या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत 15% वाढ
advertisement
जानेवारी महिन्यातच अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअरमध्ये 7% वाढ झाली आहे.
52 आठवड्यांचे निकाल
23 ऑक्टोबर 2023: 88.10 रुपये (सर्वात कमी किंमत)
21 जानेवारी 2024: 157 रुपये (सर्वाधिक किंमत)
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती
शेअरहोल्डिंग पॅटर्न (डिसेंबर 2024):
advertisement
55.12% – प्रमोटर्सची हिस्सेदारी
43.28% – गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार
उर्वरित FII आणि विमा कंपन्यांकडे
पैसे गुंतवावेत का, काय करावे? गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?
संरक्षण क्षेत्रात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्यामुळे डिफेन्स शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. DRDO, BEL, अदानी यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत ऑर्डर्स मिळाल्यामुळे कंपनीचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. 4 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत, त्यानंतर आणखी तेजी येऊ शकते.
advertisement
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market updates : बजेटआधी Defence Stock खरेदी करण्यासाठी चढाओढ, किंमतही चक्क 150 रुपयांपेक्षा कमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement