Share Market Crash: कोसळणाऱ्या शेअर मार्केटमध्ये कुठे लावायचा पैसे? एक्सपर्टनं सांगितलं नफ्याचं गणित

Last Updated:

ट्रम्प यांनी टेरिफचा नियम आणल्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. शेअर मार्केट 4000 अंकांनी कोसळले, तज्ज्ञांनी वेट अॅण्ड वॉचचा सल्ला दिला आहे.

News18
News18
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा नियम आणला, त्यानंतर आता ट्रेड वॉर होण्याची भीती आहे. शुक्रवारीपर्यंत सगळं काही ठिक सुरू असताना अचानक सोमवारी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठा भूकंप आला. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. प्री ओपनींगला मार्केट 4000 अंकांनी कोसळलं होतं. शेअर मार्केट उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी 5 टक्क्यांनी कोसळलं आहे.
या कोसळणाऱ्या मार्केटमध्ये आज ट्रेड करु नये, आज होल्ड करावं, स्थिती पाहावं कारण आज प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकण्याची घाई केली तर मोठं नुकसान होऊ शकतं. पैसे लावण्याची ही संधी मात्र रिस्क खूप मोठी आहे त्यामुळे डायरेक्ट कॉल न घेता शॉर्टलिस्ट करुन पैसे गुंतवावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. लाँग टर्मच्या अनुशंगाने आज पैसे गुंतवण्यासाठी संधी आहे असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
advertisement
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञ मानस यांनी सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका घ्यावी, विकण्याची किंवा घेण्याची घाई करू नये. पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. तर काही तज्ज्ञांनी बँकिंग, कन्झमशन, ऑईल, एफएमसीजी सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर हळूहळू वाढतील मात्र मोठं नुकसान होणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
advertisement
बाजारची सुरुवात झाल्यानंतर 2200 अंकांनी कोसळला होता. निफ्टी 800 हून अधिक अंकानी कोसळला होता. INDIA VIX 45 टक्क्यांहून अधिक अंकांनी कोसळला होता. बँक निफ्टी, निफ्टी 50, आयटी, ऑटो सेक्टरचे स्टॉक्स मोठ्या अंकांनी कोसळले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅपलाही याचा मोठा फटका बसला आहे. एकूणच शेअर मार्केटमध्ये प्रचंड दबाव असल्याने आज ब्लॅक मंडे ठरणार का याकडे तज्ज्ञांचं आणि गुंतवणूकदारांचं लक्ष असणार आहे.
advertisement
सोने आणि चांदी देखील एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. COMEX वर सोन्याचा भाव प्रति औंस 3000 डॉलर च्या खाली घसरला आहे. चांदीही 4 महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरली आहे. COMEX वर चांदी 30 डॉलरच्या खाली घसरली आहे. मंदी आणि घटत्या मागणीच्या भीतीमुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत ही मोठी घसरण दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market Crash: कोसळणाऱ्या शेअर मार्केटमध्ये कुठे लावायचा पैसे? एक्सपर्टनं सांगितलं नफ्याचं गणित
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement