Share Market: 2 आठवड्यांनंतर प्री ओपनिंगमध्ये दिलासा, कसा असेल शेअर मार्केटचा आजचा मूड

Last Updated:

आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर मार्केट, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सोमवारी कमकुवत सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शेअर मार्केट
शेअर मार्केट
मुंबई : गेल्या दोन आठवड्या शेअर मार्केट खूप जास्त कोसळलं. त्यामुळे कोट्य़वधींचं नुकसान झालं होतं. या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर मार्केट, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सोमवारी कमकुवत सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आशियातील शेअर मार्केटमध्येही दोन आठवडी मोठं नुकसान झालं. या आठवड्यात गुंतवणूकदार शेअर बाजारातील प्रमुख घडामोडींवर लक्ष ठेवतील, ज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, परकीय निधीचा ओघ, मध्य-पूर्व भू-राजकीय तणाव, यूएस बाँड यिल्ड, यूएस डॉलर, कच्च्या तेलाच्या किमतींचा कल, जागतिक बाजारातील संकेत आणि इतर देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटा या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.
advertisement
गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवारी भारतीय शेअर बाजार बंद होता. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज शेअर बाजारात काय स्थिती निर्माण होते याची धाकधूकही गुंतवणूकदारांना आहे. 9.30 वाजता शेअर मार्केटची स्थिती गुंतवणूकदारांना दिलासा देणार की चिंता वाढवणार ते पाहावं लागणार आहे.
भारतीय शेअर बाजाराचे बेंचमार्क निर्देशांक गुरुवारी घसरणीसह बंद झाले, त्यामुळे सलग सहाव्या सत्रात तोटा झाला. सेन्सेक्स 110.64 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 77,580.31 वर बंद झाला, तर निफ्टी 50 26.35 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी घसरून 23,532.70 वर बंद झाला.
advertisement
प्री ओपनिंगची सुरुवात चांगली आहे. शेअर बाजाराने चांगले संकेत दिले आहेत. आज सोनं चांदी देखील 700 आणि १००० रुपयांनी वाढलेलं आहे. सेन्सेक्स 0.22 टक्क्यांनी तर निफ्टी 0.34 अंकांनी वधारलेलं आहे. हीच स्थिती आज कायम राहिली तर गुंतवणूकदारांना सुगीचे दिवल लवकरच येतील असं म्हणायला हरकत नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: 2 आठवड्यांनंतर प्री ओपनिंगमध्ये दिलासा, कसा असेल शेअर मार्केटचा आजचा मूड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement