Share Market Today: सेन्सेक्स तेजीत, पण स्मॉल कॅप कंपन्यांनी गुंतवणूकदारांना रडवलं, काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Share Market: बँकिंग आणि फायनॅन्शियल क्षेत्राबरोबरच आज रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये पण तेजी दिसून आली.
बँकिंग आणि फायनॅन्शियल शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवार 28 जानेवारीला जबरदस्त पुनरागमन केलं. सेन्सेक्स 535 अंकांनी वाढून बंद झाला तर निफ्टी 23,000 च्या जवळ पोहोचला. मध्यम आणि लहान शेअर्समधली पडझड मात्र आजही कायम राहिली. बीएसईवरील मिडकॅप इंडेक्स 0.61 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1.77 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे आज अंदाजे 1.16 लाख कोटी रुपये बुडाले. बँकिंग आणि फायनॅन्शियल क्षेत्राबरोबरच आज रियल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये पण तेजी दिसून आली. दुसरीकडे फार्मा, इंडस्ट्रीयल्स, यूटिलिटी, कॅपिटल गुड्स आणि पॉवर शेअर्समध्ये विक्री सुरू होती.
दिवसअखेर, बीएसई सेन्सेक्स 535.23 अंक किंवा 0.71 टक्क्यांची तेजी करून 75,901.41 अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स, निफ्टी 128.10 अंक किंवा 0.56 टक्क्यांनी वाढून 22,957.25 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे बुडाले ₹1.16 लाख कोटी
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज 28 जानेवारीला घसरून 409.15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं, जे आधीच्या सत्रात 410.31 लाख कोटी रुपये होतं. अशाप्रकारे BSE वर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप का आज सुमारे 1.16 लाख कोटी रुपयांनी कमी झालं. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीची किंमत सुमारे 1.16 लाख कोटी रुपयांनी कमी झाली.
advertisement
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 19 शेअर आज वाढ होऊन बंद झाले. यात बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 4.39 टक्क्यांची सर्वाधिक तेजी होती. त्यानंतर अॅक्सिस बँक (Axis Bank), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserve), एचडीफएसी बँक (HDFC Bank) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) या शेअर्समध्ये 2.15 टक्क्यांपासून 3.82 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
सेन्सेक्समधील बाकी 11 शेअर्समध्ये आज घट झाली. यात सन फार्माचा शेअर 4.47 टक्क्यांनी घसरून टॉप लूजर ठरला. लार्सन अँड टुब्रो (L&T), पॉवर ग्रीड (Power Grid), आयटीसी (ITC) आणि एचसीएल टेकच्या (HCL Tech) शेअर्समध्ये 1.01 टक्के सेटक्क्यांपासून 1.32% तक की गिरावट देखी गई।
advertisement
टक्क्यांपर्यंत घट झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आज घट होऊन बंद झालेल्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजवरील कुल 4,084 शेअर्समध्ये आज व्यवहार झाले. यापैकी 1,311 शेअर्स वाढून बंद झाले. तर 2,663 शेअर्समध्ये घट झाली. 110 शेअर स्थिर राहिले. तसंच 60 शेअर्सने आज व्यवहारांदरम्यान आपला नवा 52-आठवड्यांतील सर्वोच्च दर गाठला. 569 शेअर्सनी 52-आठवड्यांतील निचांक गाठला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 28, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market Today: सेन्सेक्स तेजीत, पण स्मॉल कॅप कंपन्यांनी गुंतवणूकदारांना रडवलं, काय घडलं?