स्वप्न अधिकारी व्हायचं! तरुणानं सुरु केला MPSC चाय स्टॉल, दिवसाला 6 हजारांची उलाढाल

Last Updated:

अमरावतीमधील विद्यार्थी शिवाजी वाढोणकर याने चहाचे स्टॉल सुरू केले आहे. एमपीएससीची तयारी करत असताना व्यवसाय सुरू करून त्यातून तो चांगला नफा कमावत आहे. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, अमरावती
अमरावती : अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगत शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरांकडे वळतात. त्यातीलच एक असलेला विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील शिवाजी वाढोणकर. 15 वर्षांपूर्वी कुटुंबासह तो अमरावतीमध्ये स्थायिक झाला. आयुष्यात कितीही मेहनत करावी लागली तरीही सरकारी नोकरी मिळवायची अशी जिद्द त्याच्या मनामध्ये आहे. त्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू असताना कोरोना नावाचं संकट आलं आणि त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला. आर्थिक बाजू कमकुवत झाली. त्यावेळी त्याने अवघ्या 700 ते 800 रुपयांची गुंतवणूक करून स्कूटर स्टँडवर चहाचे स्टॉल सुरू केले. त्यातून त्याला कमाई होत असल्याचे बघून त्याने एमपीएससी चाय म्हणून स्टॉल सुरू केले. व्यवसाय आणि अभ्यास या दोन्हींचा मेळ साधत त्याची वाटचाल स्वप्नपूर्तीकडे सुरू आहे.
advertisement
एमपीएससीची तयार करत चहा विकणाऱ्या शिवाजीने लोकल 18 शी संवाद सांधला. तेव्हा तो सांगतो की, मूळचा मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे. काही कारणास्तव अमरावतीमध्ये 15 वर्षांपूर्वी स्थायिक झालो. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील प्रायव्हेट जॉब करत होते. त्यातूनच आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण झाले. लहापणापासूनच माझ स्वप्न सरकारी नोकरीच होत. काही कळत नव्हतं तेव्हा पण मी सरकारी नोकरीच करणार असं म्हणायचो. 11 वी पासून मी एमपीएससीच्या तयारीला लागलो. अभ्यास आणि इतर सगळं व्यवस्थित सुरू असताना कोरोना नावाचं संकट आलं. तेव्हापासून आयुष्यच बदलून गेलं.
advertisement
घरात वडील आणि भाऊ दोघे पण कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. घरची परिस्थिती एकदम डबघाईला आली. काय करावं? सुचत नव्हतं, तेव्हा चहा विकण्याची कल्पना डोक्यात आली. सर्वात आधी कापूस मंडीमध्ये पायदळ चहा विकत होतो. घरून बनवायचा आणि पायदळ जावून विकायचा. त्यानंतर स्कुटीवर सेटअप तयार केलं. त्यातून नफा मिळायला लागला. त्यातून मग हात गाडी घेतली त्यावर चहा विकायला सुरुवात केली. त्या सोबतच माझा अभ्यास सुरूच होता.
advertisement
त्यानंतर मी दुसरे चहाचे स्टॉल सुद्धा सुरू केले. आता माझे दोन स्टॉल आहेत. एक स्टॉल माझा मित्र चालवतो. गणेश गांजरे हा माझा मित्र निराश होऊन घरी परतणार होणार. कारण त्याला एमपीएससी मध्ये अपयश आले होते. मी त्याला थांबवून हा चहाचा स्टॉल त्याला चालवायला दिलाय. माझे दोन्ही स्टॉल व्यवस्थित सुरू आहे.
advertisement
अवघ्या 800 रुपयांत सुरू केलेला व्यवसायात आज माझी दिवसाला 6 ते 7 हजार रुपये उलाढाल होत आहे. माझा व्यवसाय आणि माझं स्वप्न दोन्ही मी पूर्ण करणार आहे, असे शिवाजी वाढोणकर याने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
स्वप्न अधिकारी व्हायचं! तरुणानं सुरु केला MPSC चाय स्टॉल, दिवसाला 6 हजारांची उलाढाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement