पुण्याचा अमित झाला आम्रपाली, आता सगळे जण म्हणतात सप्तरंगी आई, काम पाहून कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
आम्रपाली यांनी समाजसेवेचा विडा उचलला. त्या कित्येक सामाजिक कार्य करू लागल्या. त्यामुळे त्यांना सगळे सप्तरंगी आई म्हणतात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील आम्रपाली या मानवाधिकार मधून डॉक्टरेट असून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहेत. आम्रपाली यांचा जन्म एक मुलगा म्हणून झाला. त्यांच पूर्वीच नाव अमित होतं. जसं वय वाढू लागलं तसं अमितला त्याच्या मधील स्त्रीत्वाची जाणीव झाली. शेवटी एक अवघड निर्णय घेऊन तो आम्रपाली झाला. पुढे आम्रपाली यांनी समाजसेवेचा विडा उचलला. त्या कित्येक सामाजिक कार्य करू लागल्या. त्यामुळे त्यांना सगळे सप्तरंगी आई म्हणतात. झोपडपट्टीतील मुलांसाठी दूध वाटप, वृद्धांसाठी डायपर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड, गरजू मुलांच्या शिक्षणाची फी, समाज प्रबोधन अशी कित्येक काम त्या रोज करतात. त्याचा हा प्रवास कसा झाला हे लोकल 18 च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून किती तरी वर्ष दूर असलेली मी आपण मला सिग्नल वर पैसे मागताना पाहिलं असेल किंवा नवजात बाळ जन्माला आलेलं असेल तिथं आशीर्वाद देताना पाहिलं असेल. कोणी मला किन्नर म्हणतं तर कोणी मला हिजडा म्हणत पण मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मता नाहीये. समाजाशी, कुटुंबाशी लढून आणि स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रित्व प्राप्त केलं आहे. म्हणून मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. समाजा प्रति काही तरी दायित्व पूर्ण करायचं त्यासाठी मी काम करते, असं आम्रपाली सांगतात.
advertisement
माझा जन्म हा ताडीवाला रोड येथील एका गरीब कुटुंबात झाला आहे. घरी आई वडील दोन मोठ्या बहिणी आणि मी बायलॉजिकलं मुलगा. शरीराने जरी मुलगा असेल तरी मनाने मुलगी म्हणूनच जन्माला आले होते. वडील हे व्यसनाच्या आहारी असल्यामुळे त्यांच आमच्या कड लक्ष नसायचं लहानपणीची परिस्तिथी अत्यंत बिकट असायची की खायला ही नसायचं. वडिलांचं मी पाच वर्षाची असताना निधन झालं. त्यानंतर आई बंगल्यात काम करून आमचा उदरनिर्वाह करायची. मी दहावीत असताना आईची तब्येत खराब झाली. तेव्हा तिथे जाऊन मी काम करायला सुरुवात केली परंतु मला शिकायचं होत. कारण आई म्हणायची की आपली परिस्थिती बदलायची असेल तर तुला शिकावं लागेल.
advertisement
माझं बालपण हे मला कधी अनुभवताच आलं नाही. शाळेत कधी डब्बा ही नसायचा. आई जेवण घेऊन यायची आणि ते मला द्यायची. या संघर्षातून पुढे जाऊन मी माझ्या शिक्षणावर भर देत एम.ए पर्यंत शिक्षण घेतलं आणि जॉब पण केला. परंतु जिथे मी कामाला होते तिथे काही वाईट गोष्टी घडल्या. माझा अपमान करायचे मी तृतीय पंथी असल्यामुळे मला चिडवायचे त्यानंतर माझा प्रेम भंग झाला त्यातून मी डिप्रेशनमध्ये गेले आणि दोन वेळा सुसाईड करायचा प्रयत्न केला, असं आम्रपाली सांगतात.
advertisement
त्यातून मी बचावले आणि मग विचार केला की आपलं आयुष्य इतक्या लवकर संमपवण्या पेक्षा इतरांच्या आयुष्यात सुगंध दरवळ करू, या आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आपण इतरांनसाठी काम करू, यातून सावली सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना करून आज त्या माध्यमातून पुण्यात सहा ठिकाणी फूटपाथ शाळा चालवते. जी मुलं सिग्नल वर पैसे मागतात त्यांना शिकवते. त्याच मुलांच आरोग्य चांगल राहावं म्हणून त्यांना 50 लिटर दूध हे रोज देते. जे फूटपाथ वर महिला राहतात त्यांना मासिक पाळी कुठली काळजी घायची याबदल माहिती देते. तृतीय पंथी, दिव्यांग बांधव, देह विक्री करणाऱ्या महिला यांच्यासाठी देखील काम करते. दिव्यांग बांधवाना कुबड्या, व्हील चेअर, कृत्रिम हात पाय बसून देण्याच काम करते. रोजगाराच्या संधी व्यसन मुक्ती साठी तसेच रस्त्यावरच्या प्राण्यासाठी काम करते. ज्या आजी आजोबांना कोणी सांभाळत नाही त्यांना सांभाळण्याच काम करते.
advertisement
ज्यांना भीक मागायची नाही त्यांना पुढे रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच काम करते. जे मुलं शाळेत फी भरू शकत नाही त्यांची फी भरण्याच काम मी करते. 137 मुलांची शाळेची फी ही रस्त्यावर टाळ्या वाजून भरली आहे. 196 लोकांना व्यवसाय सुरू करून दिले आहेत आणि ह्या टाळी च्या जोरावर हजारो लोकांना रोजगार मिळून दिले आहेत. त्याच सामाजिक कामातून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. मी वेदनान साठी काम करते. मी आई होऊ शकत नाही मला गर्भश्य नसला तरी मी हजारो लेकरांची आई झाले आहे. हे आई पण माझ्याकडून कोणी घेऊ शकत नाही.
advertisement
माझा संघर्ष केवढा मोठा आहे हे महत्वाचं नाही तर आपण इतरांन साठी काय करू शकतो यासाठी मी काम करते, अशा भावनाही आम्रपाली मोहिते यांनी व्यक्त केल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 03, 2025 1:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याचा अमित झाला आम्रपाली, आता सगळे जण म्हणतात सप्तरंगी आई, काम पाहून कराल कौतुक