बँकेतील नोकरी सोडली, घरच्या घरी सुरू केला व्यवसाय, महिलेची महिन्याला 5 लाखांची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
एका महिलेने 4 ते 5 वर्षांपूर्वी आरोग्यदायी गूळ चहा पावडर प्रिमिक्स बनविण्याचा उद्योग उभारला असून आज ती यामधून महिन्याला तब्बल 5 लाखांची उलाढाल करत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : आज एखाद्या उद्योगात उतरायचे म्हणजे तितकेसे सोपे काम नसते. मात्र, एका महिलेने 4 ते 5 वर्षांपूर्वी आरोग्यदायी गूळ चहा पावडर प्रिमिक्स बनविण्याचा उद्योग उभारला असून आज ती यामधून महिन्याला तब्बल 5 लाखांची उलाढाल करत आहे. पल्लवी धनराज वाले यांनी अगदी शून्यातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. पाहुयात यशस्वी महिला उद्योजक पल्लवी वाले यांचीही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
पल्लवी धनराज वाले सोलापूरमध्ये राहतात. पल्लवी वाले या एका बँकेत कामाला होत्या. मुलांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांनी बँकेतील नोकरी सोडली आणि घरच्या घरी व्यवसाय करायचा त्यांनी निश्चित केला. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून गूळ चहा पावडर प्रिमिक्स बनवत आहेत. तसेच गुळाच्या चहामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरही त्यांनी तयार केले आहेत. रेगुलर चहा पावडर, मसाला चहा पावडर, इलायची चहा पावडर तसेच गुळाची कॉफी पावडर सुद्धा त्यांनी तयार केले आहेत. लोकांना आता बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी गोष्टी सध्या हव्या आहेत. याचा विचार करून पल्लवी वाले यांनी आरोग्यदायी प्रिमिक्स बनवले आहेत.
advertisement
प्रत्येकाच्या घरात चहापत्ती लागतेच या उद्देशाने त्यांनी हा व्यवसाय करायचा निवडला. चहामध्ये लोकांना वैशिष्ट्यपूर्ण काय देता येईल हे लक्षात घेऊन त्यांनी सुरुवातीला गवती चहा, काढा चहा, तुळस चहा, आयुर्वेदिक चहा असे सुरुवातीला पाच ते सहा फ्लेवरपासून त्यांनी सुरुवात केली. परंतु मार्केटमध्ये साखर पासून तयार होणारे पदार्थ लोक खाणे किंवा पिणे टाळत आहेत. याचा विचार करून त्यांनी गुळाचा चहा पावडर प्रिमिक्स बनवायला सुरुवात केली. आज जवळपास ते चहा फ्लेवरमध्ये पाच ते सहा फ्लेवर बनवले आहेत. तसेच त्यांनी गुळाचे बिस्किट, कढीपत्ता पावडर, बीड पावडर, शेवगा पावडर, नाचणीचे बिस्किटे, कडक भाकरी, शेंगा चटणी, इंस्टंट पुरणपोळी प्रिमिक्स पल्लवी वाले यांनी बनवले आहेत.
advertisement
घर चालवत पल्लवी वाले या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या असून महिन्याला 700 ते 800 किलो गुळाचा चहा पावडर विक्री होत आहेत. तर या व्यवसायातून महिन्याला 5 लाख रुपयांची उलाढाल त्या करत आहेत. आजूबाजू राहणारे नागरिक, आपले नातेवाईक किती प्रोत्साहन देतात किंवा काय विचार करतात हे लक्षात न घेता आपण जे व्यवसाय करायचा तो निश्चित केला की मनापासून व्यवसाय केल्यास नक्कीच यश मिळेल, असा सल्ला महिला उद्योजिका पल्लवी वाले यांनी दिला आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 24, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बँकेतील नोकरी सोडली, घरच्या घरी सुरू केला व्यवसाय, महिलेची महिन्याला 5 लाखांची उलाढाल