अमेरिकेच्या शेअर बाजारात भूकंप, नॅसडॅक कोसळला; Nike, Apple चे शेअर्सची दाणादाण! अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Trump Tariffs Impact: डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. नॅसडॅक 4.78%, S&P 500 3.97% आणि डाऊ जोन्स 3.47% घसरले. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.
न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला देखील धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारयुद्ध तीव्र झाले आहे. या धोरणांमुळे अमेरिकेतील आयातदार कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आले आहे. याचा थेट परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर झाला असून 3 एप्रिल रोजी तिथे मोठी घसरण नोंदवली गेली. अमेरिकन शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले.
अमेरिकी शेअर बाजारात मोठा धक्का
ट्रम्प यांच्या नव्या कर धोरणांचा फटका मोठ्या कंपन्यांना बसला असून, प्रमुख निर्देशांक मोठ्या प्रमाणावर गडगडले.
-नॅसडॅक (Nasdaq) निर्देशांक तब्बल 4.78% कोसळला.
-S&P 500 निर्देशांक 3.97% घसरला.
-डाऊ जोन्स (Dow Jones) मध्ये 3.47% ची मोठी घसरण झाली.
advertisement
मोठ्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले
आयातदार आणि मल्टिनॅशनल कंपन्यांवरील टॅरिफचा मोठा परिणाम दिसून आला.
-Nike च्या शेअर्समध्ये तब्बल 11% घसरण.
-Apple चे शेअर्स 9% घसरले.
-मोठ्या रिटेल कंपन्यांना फटका: Five Below च्या शेअर्समध्ये 25%, Dollar Tree मध्ये 9% आणि Gap मध्ये 20% घसरण झाली.
advertisement
Nvidia आणि Tesla वरही परिणाम
-सेमीकंडक्टर उद्योगातील प्रमुख कंपनी Nvidia च्या शेअर्समध्ये 5% घसरण झाली.
-इलॉन मस्क यांच्या Tesla च्या शेअर्समध्ये 3.5% ने घट झाली.
जागतिक बाजारांवर परिणाम
अमेरिकेतील अस्थिरतेचा फटका आशियातील प्रमुख शेअर बाजारांनाही बसला.
-चीनच्या हॅंगसेंग (Hang Seng) निर्देशांकात 1.54% घसरण झाली.
-शांघाय कंपोझिट (Shanghai Composite) 0.24% कोसळला.
सरकारने केली मोठी घोषणा, 6 कोटी खातेदारांना मिळाली गुड न्यूज; सुविधा केली मोफत
-भारत, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या बाजारांमध्येही नकारात्मक परिणाम दिसून आला.
advertisement
भारतीय शेअर बाजारावर परिणाम
भारतीय शेअर बाजारातही मोठ्या अस्थिरतेची नोंद झाली. सकाळच्या सत्रात मोठ्या घसरणीनंतर बाजार सावरला.
-BSE सेन्सेक्स 322.08 अंकांनी (0.42%) घसरून 76,295.36 वर बंद झाला.
-NSE निफ्टी 82.25 अंकांनी (0.35%) घसरून 23,250.10 वर बंद झाला.
अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट?
ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. जागतिक व्यापारयुद्ध तीव्र होत असल्याने, चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात जागतिक बाजार आणखी अस्थिर राहू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2025 10:44 PM IST
मराठी बातम्या/मनी/
अमेरिकेच्या शेअर बाजारात भूकंप, नॅसडॅक कोसळला; Nike, Apple चे शेअर्सची दाणादाण! अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट