Gold News: चीनकडून सोन्याबद्दल जगाला हादरवून टाकणारी घोषणा; बाजारात मोठी उलथापालथ होणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Rush China: चीनच्या पूर्वोत्तर भागात तब्बल 1,000 टन सोन्याचा साठा सापडल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या महाखजिन्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था, सोन्याच्या किमती आणि चीनच्या धोरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
बीजिंग: चीनच्या ईशान्य भागातील हुनान प्रांतात तब्बल 1,000 टन सोन्याचा साठा सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनला सापडलेल्या या ‘सोन्याच्या खजिन्या’ची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. कारण चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारयुद्ध तीव्र होत आहे. अशात सोने पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उदयास येत आहे.
कुठे सापडला हा सोन्याचा खजिना?
चीनच्या हुनान प्रांतातील या खजिन्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३ किलोमीटर (पूर्व-पश्चिम) आणि २.५ किलोमीटर (उत्तर-दक्षिण) आहे. हुनान भूवैज्ञानिक ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार हा साठा खाणकामासाठी सुलभ आणि सहज काढता येण्याजोगा आहे.
चीनी भूवैज्ञानिकांचा दावा
हुनान भूवैज्ञानिक ब्युरोच्या अहवालानुसार, प्रत्येक ड्रिलिंग होलमध्ये सोन्याचे अयस्क आढळले आहे. जे ही शोध मोहीम यशस्वी असल्याचे स्पष्ट करते. 2024 ची नवीन खनिज संशोधन धोरण आणि प्रगत शोध तंत्रज्ञानामुळे चीनला हा मोठा शोध लावता आला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
advertisement
संशय…
जागतिक सोन्या परिषदेने (World Gold Council) आणि इतर स्वतंत्र भूवैज्ञानिक तज्ज्ञांनी या शोधाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या साठ्याची स्वतंत्र तपासणी आणि अधिक ड्रिलिंग आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.
सोन्याच्या किमतींवर परिणाम
गोल्डमॅन सॅक्सने अंदाज व्यक्त केला आहे की, 2025 च्या अखेरीस सोन्याच्या किमती 3,700 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. 2024 मध्ये आधीच सोन्याच्या किमती 20% पेक्षा अधिक वाढल्या आहेत.
advertisement
चीन का करत आहे सोन्याचा साठा?
-चीन, भारत आणि स्वित्झर्लंड हे 2024 मध्ये जगातील सर्वात मोठे सोन्याचे आयातदार होते.
-अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे चीन सोन्याच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे.
-जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा साठा वाढवण्याचे धोरण चीन अवलंबत आहे.
सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होणार?
-वाढती महागाई, व्यापारयुद्ध, आणि जागतिक अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे अधिक आकर्षित होत आहेत.
advertisement
-चीनने जर मोठ्या प्रमाणावर सोने विकत घेण्याचे धोरण ठेवले. तर जागतिक मागणी प्रचंड वाढेल आणि सोन्याच्या किमती नवनवीन उच्चांक गाठू शकतात.
संपूर्ण जगाचे लक्ष आता या शोधाकडे लागले आहे. हा साठा चीनच्या आर्थिक धोरणांवर आणि जागतिक सोन्याच्या बाजारावर कसा परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2025 9:51 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold News: चीनकडून सोन्याबद्दल जगाला हादरवून टाकणारी घोषणा; बाजारात मोठी उलथापालथ होणार