Success Story : व्यवसायासाठी 4 वर्षांची नोकरी सोडली, सुरू केलं फूड कॉर्नर, महिन्याला 70000 कमाई

Last Updated:

अनेक जण नोकरी सोडून व्यवसायला प्रधान्य देत आहेत. वैष्णवी देवळेकर हिने चार वर्षांचा नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर आयुष्यात मोठा निर्णय घेतला.

+
चिंचपोकळीतील

चिंचपोकळीतील वैष्णवी देवळेकर हिने ४ वर्षांची नोकरी सोडून सुरू केला स्वतःचा यशस्वी फ़ूड ब्रॅंड!

मुंबई : अनेक जण नोकरी सोडून व्यवसायला प्रधान्य देत आहेत. चिंचपोकळीतील वैष्णवी देवळेकर हिने चार वर्षांचा नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर आयुष्यात मोठा निर्णय घेतला. कॉर्पोरेट आणि मेडिकल क्षेत्रात काम करत असताना तिला स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ मिळत नव्हता. स्वतःसाठी काहीतरी करायचंय या विचाराने प्रेरित होऊन वैष्णवीने नोकरीचा राजीनामा दिला आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय, श्री स्वामी समर्थ फूड कॉर्नर.
बीएमएस ग्रॅज्युएट आणि डीएमएलटी पासआऊट असलेल्या वैष्णवीला खाद्य व्यवसायाची आवड लहानपणापासूनच होती. व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला ग्राहक कमी होते, खर्चाचा ताण होता, पण तिने हार मानली नाही. वैष्णवी सांगते, मी सातत्य ठेवलं. दिवसेंदिवस लोकांचा विश्वास वाढत गेला आणि आता माझ्या फूड कॉर्नरमध्ये दररोज शेकडो लोक जेवायला येतात.
advertisement
ती स्वतः घरगुती पद्धतीचे चविष्ट आणि पौष्टिक जेवण बनवते, ज्यामुळे तिच्या ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम मिळतो. आज तिचं फूड आउटलेट चिंचपोकळीत लोकप्रिय ठिकाण बनलं आहे. नियमित ग्राहकांसोबत ती बर्थडे पार्टी, हळद, लग्न समारंभांसाठी मोठ्या प्रमाणावर केटरिंग ऑर्डरही घेते.
advertisement
या यशामागे आईवडिलांचा आधार आणि प्रोत्साहन महत्त्वाचं ठरलं, असं वैष्णवी सांगते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून आज मी इतक्या पुढे आले.
सध्या वैष्णवी दरमहा सुमारे 60 ते 70 हजार रुपये कमावते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आता स्वतःच्या वेळेची मालकीण आहे. वैष्णवी सांगते, आता माझ्यावर ना कोणाचं प्रेशर आहे, ना लिमिट्स. मी माझ्या गतीने काम करते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेते. ती तरुणांना संदेश देते की एकदा तरी आयुष्यात व्यवसाय करण्याची रिस्क घ्या, सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल.
advertisement
तिची ही प्रेरणादायी कहाणी दाखवते की धाडस आणि मेहनत असेल तर स्वप्नं नक्कीच साकार होतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : व्यवसायासाठी 4 वर्षांची नोकरी सोडली, सुरू केलं फूड कॉर्नर, महिन्याला 70000 कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement