Gold Price: सोन्याचा भाव 3.1 लाख रुपये तोळा; आज रात्री कोणालाच झोप लागणार नाही, जगप्रसिद्ध तज्ज्ञाची महाभविष्यवाणी

Last Updated:

Gold Price Prediction: सोने आणि शेअर बाजार एकमेकांचे विरोधक मानले जात असताना, पुढील काही वर्षांत दोन्हीही ऐतिहासिक उंची गाठू शकतात, असा धक्कादायक अंदाज समोर आला आहे. जगप्रसिद्ध मार्केट स्ट्रॅटेजिस्टच्या मते, हे दशक गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माणाचं सुवर्णयुग ठरू शकतं.

News18
News18
मुंबई: सोने आणि शेअर बाजार सामान्य गुंतवणूकदार बहुतेक वेळा या दोघांकडे एकमेकांचे उलट म्हणून पाहतो. शेअर बाजार वर गेला की सोने पडते आणि सोने वाढले की शेअर्स दबावात येतात, अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण जर येत्या काही वर्षांत दोन्हीही 10,000 डॉलरच्या पातळीवर पोहोचले तर? होय, हे शक्य असल्याचं मत जगप्रसिद्ध मार्केट स्ट्रॅटेजिस्ट एड यार्डेनी (Ed Yardeni) यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, हीच खरी “Roaring 2020s” ची गोष्ट असू शकते. जिथे सोने आणि शेअर्स दोन्ही एकाच वेळी इतिहास घडवतील.
advertisement
जर सोने 10,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले, तर भारतात त्याचा भाव जवळपास 3.1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होऊ शकतो. त्यामुळे हा फक्त आंतरराष्ट्रीय बाजाराचा मुद्दा न राहता, भारताच्या प्रत्येक घराशी, प्रत्येक लग्नाशी आणि प्रत्येक गुंतवणूकदाराशी जोडलेला मोठा प्रश्न ठरतो.
advertisement
जगातील आघाडीचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट एड यार्डेनी यांनी गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत धाडसी आणि चर्चेत राहणारी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, 2029 च्या अखेरीस अमेरिकााचा प्रमुख शेअर निर्देशांक S&P 500 आणि सोने दोन्हीही 10,000 च्या पातळीवर पोहोचू शकतात. विशेष म्हणजे सोने सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पटपेक्षा अधिक महाग होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
advertisement
ही भविष्यवाणी अशा काळात आली आहे, जेव्हा स्पॉट गोल्ड आधीच 4,383.73 डॉलर प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे. चालू वर्षात आतापर्यंत सोने जवळपास 67 टक्क्यांनी वाढले आहे. या तेजीसाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. जगभरातील भौगोलिक-राजकीय तणाव, ट्रेड वॉरची भीती, सेंट्रल बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी, कमकुवत डॉलर आणि अमेरिकेत भविष्यात व्याजदर कपातीची अपेक्षा.
advertisement
CNBC TV18 शी बोलताना यार्डेनी यांनी S&P 500 साठी शॉर्ट टर्म टार्गेट देखील दिले आहे. त्यांच्या मते, 2026 च्या अखेरीस हा निर्देशांक 7,700 पर्यंत पोहोचू शकतो. सध्या S&P 500 जवळपास 6,834 च्या आसपास ट्रेड करत असून यावर्षी सुमारे 16 टक्के वाढलेला आहे. म्हणजे पुढील दोन वर्षांत अजून 13 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता ते पाहत आहेत.
advertisement
जर हे भाकीत खरे ठरले, तर S&P 500 साठी सलग चौथे वर्ष असेल, जिथे इंडेक्स डबल डिजिट रिटर्न देईल. यार्डेनी सांगतात की, अल्पकालात सोने आणि शेअर्स उलट दिशेने चालत असल्यासारखे वाटले तरी, दीर्घकालात दोघांचाही ट्रेंड साधारण एकसारखाच राहिला आहे. म्हणूनच दोघांसाठीही 10,000 चा टार्गेट त्यांनी मांडला आहे.
advertisement
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्राबद्दल बोलताना यार्डेनी म्हणाले की 2026 मध्ये या सेक्टरमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकते. पूर्वीMagnificent 7’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या टेक कंपन्या स्वतंत्र साम्राज्यांसारख्या वाटत होत्या. पण AI मुळे त्या आता थेट स्पर्धेत आल्या आहेत. या स्पर्धेमुळे खर्च वाढेल आणि त्याचा फायदा इन्फ्रास्ट्रक्चरसर्व्हिसेस देणाऱ्या टेक कंपन्यांना होईल.
भारताबाबत यार्डेनींचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते, 2025 हे भारतीय शेअर बाजारासाठी कन्सोलिडेशनचे वर्ष ठरू शकते. मात्र 2026 मध्ये परिस्थिती सुधारू शकते, विशेषतः अमेरिका-भारत व्यापार चर्चांना सकारात्मक दिशा मिळाल्यास. भारत आणि चीनची तुलना करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गुंतवणुकीसाठी त्यांची पसंती भारतालाच आहे, कारण भारताची कायदेशीर आणि कॉर्पोरेट प्रणाली अधिक विश्वासार्ह वाटते.
जपानबद्दल बोलताना त्यांनी तिथल्या धोरणांना थोडं विरोधाभासी म्हटलं. एकीकडे Bank of Japan महागाईच्या भीतीने ब्रेक लावत आहे, तर दुसरीकडे सरकार फिस्कल एक्सेलरेटर दाबून ठेवत आहे. याची तुलना त्यांनी गाडी चालवताना एक पाय ब्रेकवर आणि दुसरा एक्सेलरेटरवर ठेवण्याशी केली.
एकूण पाहता, यार्डेनींची ही भविष्यवाणी सूचित करते की येणारे दशक सोने आणि शेअर्स दोन्हीसाठी मोठ्या संपत्ती निर्माण करण्याची संधी देऊ शकते. आता हे गुंतवणूकदारांवर अवलंबून आहे की ते या संधीला कसे ओळखतात आणि कसा वापर करतात.
जर सोने 10,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले, तर भारतात ती फक्त बातमी असणार नाही. ते प्रत्येक घराच्या बजेटचा, लग्नाचा आणि गुंतवणुकीच्या निर्णयांचा भाग बनेल. जे लोक वर्षानुवर्षे सोने स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही गोष्ट चिंतेची असू शकते. पण जे लोक सोने दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहतात, त्यांच्यासाठी हा पिढीत एकदा मिळणारा मोठा संधीचा काळ ठरू शकतो.
आता थोडं सोपं गणित समजून घेऊया.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलर प्रति औंसमध्ये मोजले जाते.
1 औंस 31.1 ग्रॅम.
जर सोने 10,000 डॉलर प्रति औंस झाले, तर
1 ग्रॅम = सुमारे 321 डॉलर
10 ग्रॅम = सुमारे 3,210 डॉलर
जर त्या वेळी डॉलर-रुपया दर 85 ते 90 रुपये असेल, तर भारतात 10 ग्रॅम सोन्याचा दर 2.7 ते 2.9 लाख रुपये होतो. त्यावर इम्पोर्ट ड्युटी आणि GST (सुमारे 14–15%) जोडल्यास, भारतात ज्वेलरी किंवा फिजिकल गोल्डचा भाव 3.1 ते 3.3 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतो. म्हणजे आज जे सोने 70–75 हजार रुपयांना मिळते, ते चार पटांहून अधिक महाग होऊ शकते.
दोन प्रकारचे लोक 
पहिले: जे सामान्य लोक लग्न, सण किंवा दागिन्यांसाठी सोने स्वस्त होण्याची वाट पाहत आहेत. जर 10,000 डॉलरचा अंदाज खरा ठरला, तर सोने स्वस्त होणार नाही, उलट आणखी दूर जाईल. लग्नात सोन्याचं वजन कमी होईल, हलके डिझाइन्स येतील आणि लोक डिजिटल गोल्ड किंवा हलक्या दागिन्यांकडे वळतील. थोडक्यात सांगायचं तर आज न घेतलेलं सोने उद्या अधिक महाग मिळू शकतं.
दुसरे: गुंतवणूकदार. त्यांच्यासाठी चित्र पूर्णपणे वेगळं आहे. यार्डेनींच्या मते, सोने आणि शेअर बाजार दीर्घकाळात एकत्र वाढतात. जर सोने 10,000 डॉलरपर्यंत पोहोचले, तर Gold ETF, Sovereign Gold Bond, Digital Gold यामध्ये आधी गुंतवणूक केलेल्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
समजा एखाद्याने 60–70 हजार रुपयांना सोने घेतले आणि भाव 3 लाखांपर्यंत गेला, तर तो 4–5 पट रिटर्न ठरू शकतो, तोही कंपनी रिस्कशिवाय. गुंतवणूकदारांसाठी सोने महागाईपासून संरक्षण, चलन कमकुवत झाल्यावर सुरक्षा आणि भौगोलिक-राजकीय संकटात सेफ हेवन म्हणून काम करतं. म्हणूनच आजही सेंट्रल बँका आणि स्मार्ट गुंतवणूकदार सोने सोडायला तयार नाहीत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price: सोन्याचा भाव 3.1 लाख रुपये तोळा; आज रात्री कोणालाच झोप लागणार नाही, जगप्रसिद्ध तज्ज्ञाची महाभविष्यवाणी
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement