Mumbai: कर्ज वाईट असतं! 'ती' रात्री वॉकला गेली अन्..., सत्य ऐकून पोलीसही स्तब्ध, मुंबईतील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
दिनांक २४ डिसेंबर रोजी रात्री मयत महिला ही रायझिंग सीटी परिसरात वॉकिंग करीता गेली होती. पण, बराच वेळ झाला नाही.
राजेश शिंदे, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्जाची परतफेड न केल्यामुळे महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घाटकोपर भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्वेतील रायझिंग सिटी परिसरात ही घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती. अमिना बी सिद्दिकी असं मयत महिलेचं नाव आहे. ४१ वर्षीय अमिना सिद्दिकी याा रात्री वॅाक करण्यास गेल्या होत्या, त्यानंतर त्यांचा मृतदेह झुडपात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला. अखेरीस पाचव्या दिवशी पंतनगर पोलिसांनी या हत्येचा छडा लावण्यात यश आलं आहे. या प्रकरणी मोहम्मद इरफान उर्फ चांद फकरेआलम अंसारी या आरोपीला अटक केली आहे.
advertisement
झुडुपात आढळला मृतदेह
आरोपी मोहम्मद इरफान अन्सारी याच्या पतीने मयत महिलेला ३ लाख रूपये कर्ज दिलं होतं. मात्र ते परत न केल्याचा राग मनात धरून आरोपीने तिची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी रात्री मयत महिला ही रायझिंग सीटी परिसरात वॉकिंग करीता गेली होती. पण, बराच वेळ झाला नाही. ती परत घरी आली नाही. त्यामुळे मयत महिलेचा सर्वत्र शोध घेतला. पण कुठेही आढळली नाही. मयत महिलेल्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पंतनगर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाल्यानंतर महिलेचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी सकाळी २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास केटी ९ समोरील झुडुपात सदर महिलेचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर मयत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
advertisement
३ लाखांच्या कर्जासाठी खून
view commentsघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाआयुक्त, परिमंडळ ७ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ पोलीस तपास पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, मोबाईल फोनसंदर्भात तांत्रिक तपास केला, साक्षीदारांकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली, संबंधितांचे पूर्व इतिहास पडताळलं असता आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली आणि इतर आवश्यक तपास केला. त्यानंतर पोलिसांनी २९ डिसेंबरला आरोपी मोहम्मद इरफान अन्सारीला अटक केली. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली. मयत महिला हिने यातील आरोपीच्या पत्नीकडून घेतलेले पैसे परत दिले नाहीत. या गोष्टीचा राग मनात धरून त्या महिलेवर पाळत ठेवून सदरचा खून केल्याचं निष्पन्न झालं असून अधिक तपास चालू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: कर्ज वाईट असतं! 'ती' रात्री वॉकला गेली अन्..., सत्य ऐकून पोलीसही स्तब्ध, मुंबईतील घटना









