तीच चव, तोच स्वाद, 50 वर्षांनंतरही लोकांचा तितकाच प्रतिसाद; साबुदाणा वड्यासाठी प्रसिद्ध असलेलं दादरमधील फेमस ठिकाण

Last Updated:

इथला साबुदाना वडा आणि त्यासोबतची चटनी म्हणजे निव्वळ सुख आहे, असं दादरकर म्हणतात. दादर पश्चिम येथील गोखले रोडवर असणारे हे प्रकाश उपहार केंद्र शाकाहारी पदार्थांसाठी खूप फेमस आहे.

+
प्रकाश

प्रकाश उपहार केंद्र

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : दादरमध्ये एकाहून एक सरस अशा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची रेलचेल असणारी ठिकाणे आहेत. त्यातलेच एक म्हणजे प्रकाश शाकाहारी उपहार गृह. याठिकाणी कोथिंबींर वडी, मिसळ, साबुदाना खिचडी, साबुदाना वडे, वांगी पोहे असे चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आहेत.
इथला साबुदाना वडा आणि त्यासोबतची चटनी म्हणजे निव्वळ सुख आहे, असं दादरकर म्हणतात. दादर पश्चिम येथील गोखले रोडवर असणारे हे प्रकाश उपहार केंद्र शाकाहारी पदार्थांसाठी खूप फेमस आहे. इथे थंड पेयांमध्ये मिळणारे पियुष्य अत्यंत लोकप्रिय आहे. प्रकाश उपहार केंद्रात मिळणारे साबुदाणा वडे ही प्रकाश उपहार केंद्राची ओळख आहे.
advertisement
1971 ला सुरू झालेले प्रकाश उपहार केंद्र आजही त्यांची चव टिकवून आहे. गेले 53 वर्ष दादरकरांना शुद्ध शाकाहारी पदार्थ खायचे असतील तर ते हमखास इथेच येतात. या उपहार केंद्रात आल्यानंतर तिथलं वातावरण आज मराठी माणसाला आवडेल असंच आहे. उपहार केंद्रातले सगळेच लोक येणाऱ्या गिऱ्हाईकांशी अत्यंत आपुलकीने बोलतात. त्यांची आणखी एक विशेषत: म्हणजे ते कोणतेच पदार्थ बनवून ठेवत नाहीत तर ऑर्डर आल्यानंतरच तो पदार्थ बनवला जातो. इथे मिळणारे मिसळ पुरी, थालीपीठ, कोथिंबीर वडी ग्राहकांना खूप आवडतात. यांची किंमत सुद्धा अगदी कमी आहे. साबुदाणा वड्यांची किंमत तर फक्त 60 ते 70 रुपये असून त्यांची चव दादरकरांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
'आमचे साबुदाणा वडे आमची खासियत आहेत. या उपहार केंद्रात कोणतेच पदार्थ बनवून ठेवले जात नाही तर ऑर्डर आल्यानंतर गरमागरम आम्ही बनवतो. आज गेले 50 वर्ष आमच्याशी अनेक गिऱ्हाईकांशी इथल्याच पदार्थांनी नाती जोडलेली आहेत. यापुढेही आम्ही असेच उत्तम अन्न लोकांना देण्याचा प्रयत्न करू,' असे तिथे वेटर म्हणून गेले 40 वर्षे काम पाहणाऱ्या शांताराम उर्फ दाजी यांनी सांगितले.
advertisement
जर तुम्ही अस्सल खवैय्ये असाल आणि तुम्हालाही दादरमधील उत्कृष्ट शाकाहारी पदार्थ चाखायचे असतील तर तुम्ही दादरमधील या प्रकाश उपहार केंद्राला नक्की भेट देऊ शकतात.
मराठी बातम्या/मुंबई/
तीच चव, तोच स्वाद, 50 वर्षांनंतरही लोकांचा तितकाच प्रतिसाद; साबुदाणा वड्यासाठी प्रसिद्ध असलेलं दादरमधील फेमस ठिकाण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement