मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचं! लक्षणं काय, उपचार कसा करावा?, महत्त्वाची माहिती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
आपल्याला माहिती आहे की माणसाच्या जीवन घडणी मध्ये मानसशास्त्र हे अनेक प्रकारे काम करत असत जस की तुमचे विचार, वागण, राहणीमान, निर्णय या सगळ्यां मध्ये माणसाचं मानसिक आरोग्य सांभाळण देखील तितकंच महत्वाचं असत तर यामध्ये माणसाच्या सर्व हालचाली वर लक्षण ठेऊन आपण आपलं मानसिक आरोग्य चांगल ठेवण्यासाठी मदत होते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आजकाल जर आपण पाहिलं तर मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. यामध्ये तरुणवर्गाचा मोठा समावेश पाहायला मिळतो. नैराश्याच्या लक्षणांमध्ये झोप न लागणे, सतत दुःखाची भावना, कशातही रस नसणे, अपराधीपणाची भावना, निर्णय घेण्यात अडचण, आपले विचार व्यक्त करण्यास असमर्थता यांचा समावेश होतो.
जर एखाद्याला दीर्घकाळापर्यंत हे होत असेल तर त्याने निश्चितपणे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला अनेक वेळा दिला जातो. मात्र, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी अधिक माहिती डॉ. वासुदेव परळीकर यांनी दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याला माहिती आहे की माणसाच्या जीवन घडणीमध्ये मानसशास्त्र हे अनेक प्रकारे काम करत असते. जसे की तुमचे विचार, वागणे, राहणीमान, निर्णय या सगळ्यांमध्ये माणसाचे मानसिक आरोग्य सांभाळणेदेखील तितकेच महत्वाचे असते. यामध्ये माणसाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन आपणे आपले मानसिक आरोग्य चांगल ठेवण्यासाठी मदत होते.
advertisement
खुराकसाठीही नव्हते पैसे, पण देशासाठी मिळवले सुवर्णपदक; कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या मुलीची प्रेरणादायी कहाणी
नेहमी ज्याला आनंदी वाटतं तो निरोगी आणि ज्याला कधीही टेन्शन तोही निरोगी, अशी समजूत पूर्वी होती. मात्र, शास्त्राने हे मान्य केल आहे की, चांगल्या गोष्टीसाठी झगडताना ताण आला, जखमा झाल्या, धडपडलात तसेच येणारे नकारात्मक विचार, यामुळे निरोगी आरोग्याची संकल्पना ही बदलते आहे. यामध्ये अपुऱ्या माहितीचा अभाव पाहायला मिळतो.
advertisement
मानसिक आजार हा कुठल्या ही एका स्तरापुरता मर्यादित असा राहिला नाही. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत अनेक जण ग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे आणि अनेक जणांना यावर उपचार घ्यायचे म्हटल्यावर कमी पणाचे वाटते. संघर्ष कायम आहे म्हणजे जे मला हवं आणि जे मनात आहे, यामध्ये गॅप कायम आहे. परंतु हा भरून काढण्याचा प्रयत्न करणे, हे निरोगी मनाचे लक्षण आहे.
advertisement
1 ऑगस्टपासून करता येणार पीक पेऱ्याची नोंदणी, शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी?, मोबाईलवरच भरता येणार माहिती..
तसेच मानसिक आजार बघताना मेंदूचा आजार नाही ना, हेदेखील पाहायला हवे. अनेक वेळा शारीरिक आजारामुळे मेंदूवर परिणाम होतो. यामुळे वागण्यात बदल होतात. तसेच जर लैंगिक, शारीरिक, भावनिक टप्पे बघून त्यावर लक्ष ठेवणं ते इतरांशी शेअर करू शकतो का, ते जमतंय का, माझा हक्क आहे म्हणून कोणाशी भांडण केले नाही ना, या सगळ्यावर लक्ष ठेऊन आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 31, 2024 12:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचं! लक्षणं काय, उपचार कसा करावा?, महत्त्वाची माहिती, VIDEO