1 ऑगस्टपासून करता येणार पीक पेऱ्याची नोंदणी, शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी?, मोबाईलवरच भरता येणार माहिती..

Last Updated:

आपल्या शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सातबारा उताऱ्यावर वस्तुनिष्ठ अचूक आणि पारदर्शक नोंद व्हावी, याकरता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येतो. यावर्षीच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे.

+
ई

ई पीक पाहणी अॅप

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : येत्या 1 ऑगस्टपासून पीक पेरा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्हाला पिक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. आपल्या शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सातबारा उताऱ्यावर वस्तुनिष्ठ अचूक आणि पारदर्शक नोंद व्हावी, याकरता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येतो. यावर्षीच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना स्वतःहून आपल्या पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करता येणार आहे.
advertisement
नोंद कशी करावी -
ई-पीक पाहणीचे अद्ययावत ॲप तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.
त्यानंतर पीक क्षेत्रात जाऊन नाव, गाव, गट क्रमांक नोंदणी करून पिकांची माहिती, अक्षांश, रेखांश यासह पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
माहिती भरताना या गोष्टी आवश्यक -
ॲप्लिकेशनच्या नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत 48 तासात केव्हाही एका वेळा दुरुस्ती करू शकतो.
advertisement
शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करायची का? असा प्रश्न विचारला जातो. तशी नोंदही आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते.
यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे.
advertisement
मदत बटन
advertisement
आता शेतकऱ्यांना मदत बटन हे उपलब्ध झाले आहे.
पिक पाहणी का महत्त्वाची ?
शासन राबवत असलेली पिक विमा योजना पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्ती मदत विशेषणाची किमान आधारभूत किंमत योजना यासाठी पीक पेऱ्याची नोंद महत्त्वाची आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
1 ऑगस्टपासून करता येणार पीक पेऱ्याची नोंदणी, शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी?, मोबाईलवरच भरता येणार माहिती..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement