खुराकसाठीही नव्हते पैसे, पण देशासाठी मिळवले सुवर्णपदक; कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या मुलीची प्रेरणादायी कहाणी

Last Updated:

रोहिणी देवबाचे वडील शेतीतून मिळणाऱ्या पैशांवर गुजराण करत आहेत. रोहिणीचे प्रशिक्षण तर लांबचीच गोष्ट, तिच्या खुराकासाठी देखील तिचे वडिल पैसे जमवू शकत नाहीत. त्यामुळेच मोफत तिला प्रशिक्षण दिले जात होते.

+
रोहिणी

रोहिणी देवबा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर ही कुस्तीपटुंची पंढरी असल्याचे एका घटनेमुळे आता पुन्हा दिसू लागले आहे. शेतमजूर असलेल्या सामान्य शेतकऱ्याच्या 13 वर्षीय मुलीने नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पंधरा वर्षाखालील 33 किलो गटात यश मिळवले आहे. रोहिणी देवबा असे या लहानग्या कुस्तीपटूचे नाव आहे. तिने थायलंडमध्ये भारताचे प्रातिनिधित्त्व करत उझबेकीस्तानच्या कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकले आहे.
advertisement
घरची परीस्थिती अत्यंत गरीबीची असतानाही परिश्रम घेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल रोहिणीची गावकऱ्यांनी चक्क हत्तीवरून जंगी मिरवणूकही काढली होती. तर तिच्या या यशाचे सध्या पंचक्रोशित कौतुक देखील होत आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात देवबा कुटुंब राहते. या कुटुंबाची घरची परीस्थिती अत्यंत प्रतिकूलच. वडिलोपार्जित फक्त 17 गुंठे जमीन कसणाऱ्या शेतमजूर आणि शेतकरी खानदेव यांना 2 मुले आणि 3 मुली आहेत. खानदेव यांना देखील कुस्तीची प्रचंड आवड होती. मात्र, परिस्थितीमुळे आहे त्यांना स्वतःची आवड जपता आले नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या मुलीला, रोहिणीला अगदी वयाच्या नवव्या वर्षापासून कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली होती. वेळप्रसंगी घरातील दागिनेही त्यांनी गहाण ठेवले होते. मात्र, याच परिस्थितीतून अथक परिश्रमाने आता रोहिणीने आई-वडिलांचे पांग फेडले आहेत. मजल दरमजल करत तिने आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
advertisement
बदामही न खाता रोहिणी सुवर्णकन्या -
रोहिणी ही गेली 4 वर्षे कोल्हापूरच्या दोनवडे येथील एनआयएस कुस्ती केंद्र या ठिकाणी संदीप पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सराव करत आहे. दररोज सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास ती सराव करत असे. त्यामुळेच थायलंड येथे झालेल्या पंधरा वर्षाखालील झालेल्या एशियन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. रोहिणी देवबाचे वडील शेतीतून मिळणाऱ्या पैशांवर गुजराण करत आहेत. रोहिणीचे प्रशिक्षण तर लांबचीच गोष्ट, तिच्या खुराकासाठी देखील तिचे वडिल पैसे जमवू शकत नाहीत. त्यामुळेच मोफत तिला प्रशिक्षण दिले जात होते. अशा परिस्थितीमध्ये रोहिणीने कधी साधे बदामही न खाता, भारत देशासाठी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे, ही खूपच कौतुकास्पद बाब आहे, असे मत रोहिणीचे प्रशिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना संदीप पाटील यांनी सांगितले की, 15 वर्षाखालील स्पर्धा ही चांगलीच चुरशीची स्पर्धा होती. या स्पर्धेच्या तयारीसाठी रोहिणीचा मुलांच्या बरोबर कुस्ती करून सराव करून घेण्यात आला. त्यामुळेच जे भारतातील फेऱ्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तिने चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीपासूनच फायनल पर्यंत तिने कुणालाही विरोधात पॉइंट मिळवू दिले नाहीत. त्यामुळेच 10-0 च्या फरकाने सर्वांना हरवत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
advertisement
कशी झाली एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा?
भारताचे नेतृत्व करत रोहिणीने 33 किलो वजनी गटात जपान, मंगोलिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांच्या खेळाडूंवर मात केली. जपानच्या मुलीबरोबर रोहिणीची पहिली कुस्ती झाली. फक्त त्या मुलीनेच 2-0 च्या फरकाने रोहिणीला रोखले होते. पण तिचा अभ्यास केला असल्याने तिला पराभूत करण्यापासून फायनलला रोहिणीने धडक मारली. रोहिणीची फायनल उझबेकिस्तानच्या मुलीबरोबर होती. मात्र, तिचा मुलांसोबत कुस्तीचा सराव झाला असल्यामुळे 10-0 च्या फरकाने तिने फायनलमध्ये प्रतिस्पर्धी स्पर्धकाला हरवत पदकावर आपले नाव कोरले, असेही संदीप पाटील म्हणाले.
advertisement
कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्पर्धांसाठी ट्रायल झाल्या होत्या. त्यानंतर नोएडा येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. पुढे नोएडामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी ट्रायल झाल्या. त्यामधून निवड झाल्यामुळेच थायलंडमध्ये मला स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करता आले. आता ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. यापुढेही ऑलिम्पिकचे माझ्ये ध्येय असून त्यासाठीची माझी तयारी सुरू राहील, असे रोहिणी देवबाने सांगितले आहे.
advertisement
सुवर्णकन्येची हत्तीवरून काढली मिरवणूक -
गावाची सुवर्णकन्या बनलेल्या रोहिणीने गावासह जिल्ह्याचे नाव गाजवले आहे. त्यामुळेच तिच्या आई-वडिलांसह गावकऱ्यांनाही अपार आनंद झाला आहे. म्हणूनच गावकऱ्यांनी ढोल ताशांचा गजर आणि लेझीमसह गावातून साखर वाटत चक्क हत्तीवरून रोहिणीची  मिरवणूक काढली होती. रोहिणीचा नागरी सत्कार करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रोहिणीच्या या कामगिरीमुळे तिच्याप्रमाणेच घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या मुलींना आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रोत्साहनाचे नवे बळ नक्कीच मिळू शकते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
खुराकसाठीही नव्हते पैसे, पण देशासाठी मिळवले सुवर्णपदक; कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या मुलीची प्रेरणादायी कहाणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement