Abhishek Ghosalkar - अभिषेक घोसाळकरांच्या हत्येची ‘चावी’; मॅारिसनं थंड डोक्याने असा केला प्लॅन
- Published by:Priya Lad
Last Updated:
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला अटक करण्यात आली आहे. त्याच्या पोलीस चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.
अजित मांढरे/मुंबई : मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. त्यानं त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. बॉडीगार्डच्या पिस्तुलानं त्यानं गोळीबार केला आणि नंतर स्वतःवरही याच पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला अटक करण्यात आली आहे. त्याच्या पोलीस चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. मॉरिसनं बंदूक ज्या लॉकरमध्ये ठेवली होती त्याची डुप्लिकेट चावी बनवली होती.
18 डिसेंबर 2023 या दिवशी एका सिक्युरीटी एजन्सीमध्ये मॉरिस आणि अमरेंद्रची भेट झाली होती. 26 डिसेंबर 2023 या दिवशी मॉरिसने अमरेंद्रला बॅाडीगार्ड म्हणून कामावर ठेवून घेतलं होतं. अमरेंद्र मिश्रा हा गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. अमरेंद्रला 2003 मध्ये यूपीच्या प्रयागराज मधील फुलपूर पोलिसांनी पिस्तुल परवाना जारी केला होता. त्या परवान्याची मुदत फेब्रुवारी 2026 पर्यंत होती. त्याच्या पिस्तुलाचा वापर तो स्वत: आणि मॉरिस दोघंही करत होते. अमरेंद्र मिश्रा त्याचे पिस्तुल मॉरिसच्या ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवायचा. ज्यादिवशी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली त्यावेळीही त्याच लॉकरमध्ये पिस्तुल ठेवलं होतं. त्याच लॉकरमधून मॉरिसने पिस्तुल काढून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला.
advertisement
31 डिसेंबर 2023 या दिवशी अमरेंद्र त्याच्या गावी उत्तर प्रदेशला कामानिमित्त गेला होता. 17 जानेवारी 2023 या दिवशी तो पुन्हा कामावर मॉरिसचा बॅाडीगार्ड म्हणून रुजू झाला. हा गोळीबार झाला त्या दिवशी अमरेंद्र मॉरिससोबत होता. पण मेहुलची आई हॅास्पिटलमध्ये अॅडमिट असल्याने मॉरिसनं अमरेंद्रला मेहुलसोबत पाठवून दिलं. मॉरिसने अमरेंद्रला त्याची बंदूक ॲाफिसच्या लॉकरमध्ये ठेवायला सांगितली होती. त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलावून फेसबूक लाईव्ह करत हत्या केली.
advertisement
म्हणजे घटना घडली तेव्हा अमरेंद्र तिथं नव्हता. मॉरिसनं लॉकरची डुप्लिकेट चावी बनवली होती आणि याची माहिती अमरेंद्रला नव्हती. असं अमरेंद्रच्या पोलीस चौकशीत समोर आलं आहे. याचा अर्थ अभिषेक यांना मारण्याचा कट मॉरिसनं आधीच रचला होता, या निष्कर्षावर पोलीस पोहोचलेत.
advertisement
क्राइम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, अभिषेक घोसाळकर यांच्यावर ज्या पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला, ते अत्यंत उच्च दर्जाचे असून ते एकावेळी 15 राउंड फायर करू शकते. क्राईम ब्रँचने या हत्येप्रकरणी दोन एफआयआर नोंदवले आहेत, पहिला खून आणि दुसरा आत्महत्येचा. क्राइम ब्रँचने अमरेंद्र मिश्रा याला शस्त्रास्त्र कायदा 29 ब आणि 30 अंतर्गत अटक केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2024 12:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Abhishek Ghosalkar - अभिषेक घोसाळकरांच्या हत्येची ‘चावी’; मॅारिसनं थंड डोक्याने असा केला प्लॅन