Mumbai : मुंबईकरांनो! निरोगी समजून पित असलेलं दूधच ठरलं धोकादायक; अंधेरीतील धक्कादायक वास्तव समोर

Last Updated:

Andheri News : अंधेरीतील परिसरात दुधात भेसळ करणाऱ्या सात जणांविरोधात वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने छापा टाकत भेसळयुक्त दूध तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

News18
News18
मुंबई : अंधेरी परिसरात दुधात भेसळ करणाऱ्या टोळीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन महिलांचाही समावेश असून अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत गंभीर मानली जात आहे.
आरोपींची नावे रवि अंजया कलिमारा, व्यंक्यया यदयया वैरु, जवाजी श्रीनिवास, रामलिंगच्या गज्जी, नरसिम्हा रामचंद्र कोलापल्ली, रजनी भास्कर बतुला आणि मंजुला रमेश जवाजी अशी आहेत. अटकेनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
दररोज घराघरात जाणारं दूध धोकादायक बनलं?
अंधेरीतील चार बंगला परिसरातील नवजीतनगर रहिवाशी संघातील काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनीय माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. या भेसळयुक्त दुधाची परिसरात खुलेआम विक्री तसेच वितरण सुरू असल्याचेही समोर आले होते. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
advertisement
पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई नसरुद्दीन इनामदार, किंजळकर आणि जाधव यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नवजीतनगर रहिवाशी संघातील तीन ते चार खोल्यांवर एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान दुधात भेसळ करताना दोन महिलांसह सात जण रंगेहाथ आढळून आले.
छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईकरांनो! निरोगी समजून पित असलेलं दूधच ठरलं धोकादायक; अंधेरीतील धक्कादायक वास्तव समोर
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement