अतिवृष्टीत डान्स करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांशी धक्कादायक वर्तन
- Reported by:BALAJI NIRFAL
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आल्यचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
धाराशिव: अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात दाणादाण उडाली असताना या कालावधीत डान्स करण्याचा प्रताप करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ .कीर्ती किरण पुजार यांचा आणखी एक कारनामा चर्चेत आला आहे. जमिनीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांबरोबर जिल्हाधिकऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलन करायला जिल्हाधिकारी कार्यालयच सापडते का, बाहेर जाऊन आंदोलन करा, असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आल्यचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वडगाव सिद्धेश्वर येथील शेतकरी एमआयडीसीने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने वेशभूषा करून भीकमागो आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आले होते. जिल्हाधिकारी यांनी या अगोदर ही अनेक वेळा शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना उद्धट वागणूक दिल्याचा आरोप आहे.
माध्यमांवर देखील दबाव
शेतकऱ्यांसोबत झालेल्या गोंधळानंतर या संदर्भात गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील तंबी देत बातमी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करत जावा असे सांगितले. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद करू नये यासाठी शूटिंग बंद करण्यासाठी दबाव टाकला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
advertisement
जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यामध्ये संताप
जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यामध्ये संताप निर्माण झाला आहे. वडगाव सिद्धेश्वर येथील शेतकरी मोबदला मिळत नसल्याने वेशभूषा करून भीकमागो आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आलं असताना हा प्रकांर घडला आहे. अतिवृष्टीत केलेल्या डान्समुळे जिल्हाधिकारी चर्चेत आले होते. एवढचं नाही तर त्यांनी या अगोदर ही अनेक वेळा शेतकऱ्यांना व आंदोलकांना उद्धटपणे वक्तव्य केली आहेत . आता या प्रकरणामुळे ते आणखी अडचणी आले आहेत
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 3:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अतिवृष्टीत डान्स करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांशी धक्कादायक वर्तन










