Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये मोठी दुर्घटना; मच्छिमारांची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सिंधुदुर्गमधून मोठी बातमी समोर आली आहे. बोट बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. आचरा समुद्रामध्ये ही घटना घडली आहे.
सिंधुदुर्ग, विशाल रेवडेकर, प्रतिनिधी : सिंधुदुर्गमधून मोठी बातमी समोर आली आहे. बोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, आचरा समुद्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे. समुद्रामध्ये मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांची बोट दगडाला आपटली. या अपघातामध्ये बोटीच्या मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण थोडक्यात बचावला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दाट धुक्यामुळे अंदाज न आल्यानं आचरा समुद्रामध्ये मच्छीमारी करणारी बोट दगडाला आपटून अपघात घडला. यामध्ये बोट मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, या बोटीमध्ये चौघेजण होते, चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला तर एक थोडक्यात बचावला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातातून वाचालेला खलाशी पोहून किनारपट्टीवर आला, त्याने घडलेल्या घटनेची माहिती तेथील ग्रामस्थांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघाांचा मृत्यू झाला होता. बोट दगडाला जोरात आपल्यामुळे बोट जाग्यावरच बुडाली. ही बोट रविवारी मध्यरात्री बुडाली. तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
August 19, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये मोठी दुर्घटना; मच्छिमारांची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू


