...म्हणून पक्षातील नेते सुद्धा जवळ उभं करत नाहीत; भास्कर जाधवांवर भाजपचा जोरदार पलटवार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
मुंबई, 12 सप्टेंबर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी बावनकुळे यांचा उल्लेख वेस्ट इंडीजचा प्लेअर असा केला होता. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं असून, भाजपकडून भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उपाध्ये?
'भास्कर जाधव यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी तोंड उघडले की गटारगंगा वाहत असते, याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या जवळपास कोणी फिरकत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांना दोन हात दूर ठेवतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा पक्ष वाढीसाठी असलेला धुमधडाका पाहून 'मातोश्री' चे डोळे दिपले असणार आणि भुंकण्यासाठी भास्कररावांचा पट्टा काढला असणार ! तुम्ही भुंकत राहा, दुसरे प्रवक्ते थुंकत राहतील, तुमच्या असल्या शिव्याशापांमुळे आमचा पक्ष जिंकत राहील ! काय करणार? गटाराचं तोंड तर धरू शकत नाही !' असा जोरदार पलटवार केशव उपाध्ये यांनी केला आहे.
advertisement
तोंड उघडले की गटारगंगा !
भास्कर जाधव यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी तोंड उघडले की गटारगंगा वाहत असते, याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या जवळपास कोणी फिरकत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांना दोन हात दूर ठेवतात.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी… pic.twitter.com/7uN93D1q5R
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 12, 2023
advertisement
भास्कर जाधव यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
view comments'तुम्ही उद्धव ठाकरेंवर व्यक्तिगत टीका करता ते तुम्हाला चालतं का?, तुम्ही उद्धव साहेबांना घरकोंबडा म्हणता शेवटी वेस्ट इंडिजच्या मानसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2023 3:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
...म्हणून पक्षातील नेते सुद्धा जवळ उभं करत नाहीत; भास्कर जाधवांवर भाजपचा जोरदार पलटवार


