BMC Election 2026 : महायुतीचं ठरलं,200 जागांवर एकमत, 27 ठिकाणी 'वेट ॲड वॉच',बैठकीत काय ठरलं?

Last Updated:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेनत सुरू असलेली बैठक आता संपली आहे.या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झाले आहे, तर 27 जागांवर विरोधकांचे कोणते उमेदवार असणार आहे,

Eknath shinde Devendra fadnavis
Eknath shinde Devendra fadnavis
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेनत सुरू असलेली बैठक आता संपली आहे.या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झाले आहे, तर 27 जागांवर विरोधकांचे कोणते उमेदवार असणार आहे, त्यानुसार महायुती आपले उमेदवार ठरवणार आहे. त्यामुळे जागावाटप संदर्भातला कोणताही तिढा उरलेला नसल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
महायुतीची रंगशारदामधील बैठक पार पडल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी या बैठकीचा तपशील दिला आहे.227 जागा जागांवर आमचे उमेदवार ठरले आहेत. 200 जागांवर आमचे एकमत झाले आहे.आणि 27 जागांवर देखील आमचे उमेदवार ठरले असून विरोधकांचे त्या 27 जागांवर उमेदवार कोण असणार आहेत, यानंतर आम्ही आमचे उमेदवार ठरवणार असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले आहे.जागावाटपसंदर्भातला कोणताही तिढा नाही
advertisement
शिवसेनेचे राहुल शेवाळे बैठकीनंतर म्हणाले, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भातली घोषणा करतील. जागावाटपावर तिढा वगैरे राहिलेला नाहीये दोन-तीन गोष्टीवर आमची चर्चा झालेली आहे.जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषित करतील तो त्यांचा अधिकार आहे.ज्या जागांचा तिढा होता त्या जागांची चर्चा झाली ही सर्व माहिती आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिली जाणार आणि यासंदर्भात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सोबत चर्चा करतील उद्या आणि परवा याबाबतची घोषणा केली जाईल
advertisement
तसेच कुठलाही राजकीय पक्ष अजून पर्यंत कोणत्या आघाडीने किती जागा लढणार ही घोषणा केलेली नाही दोन दिवसापूर्वी उबाठा मनसे यांचे युती झाली पण त्यांनी देखील आपल्या जागा घोषणा केलेली नाही. आम्ही देखील या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलेले आहेत सगळे जागा घोषित करतील त्यावेळेस आम्ही जागा घोषित करू अगोदरच आपला आकडा सांगू नये हे राजकीय गणित आहे, असेर राहुल शेवाळे यांनी सांगितले.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री लवकरच जागावाटप संदर्भात घोषणा करतील.महायुती एक परिवार आहे परिवार म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत 227 जागेत आम्ही परिवार म्हणून कुटुंब म्हणून निवडणूक लढतोय मोठा भाऊ छोटा भाऊ कुठेही नाही. दीडशेपेक्षा जास्त माहितीचे उमेदवार जिंकतील आणि मराठीत महापौर होईल,असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election 2026 : महायुतीचं ठरलं,200 जागांवर एकमत, 27 ठिकाणी 'वेट ॲड वॉच',बैठकीत काय ठरलं?
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement