BMC Bharti 2025: 10वी, 12वीच्या तरूणांना मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! 90,000 पर्यंत मिळणार पगार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
BMC Recruitment 2025: मुंबई महानगर पालिकेमध्ये नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये ही नोकरभरती केली जाणार आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक्स रे सहाय्यक अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही नोकर भरती केली जात आहे.
अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई महानगर पालिकेमध्ये नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये ही नोकरभरती केली जाणार आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक्स रे सहाय्यक अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही नोकर भरती केली जात आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये आणखी कोणकोणत्या पदांसाठी भरती केली जात आहे? अखेरची तारीख काय? सह अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
मुंबई महानगर पालिकेमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडूनच अर्ज मागविण्यात येत आहे. तरी 10वी, 12वी आणि पदवीधर सोबतच इतर पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, बा.य.ल. नायर धर्मादाय. रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करण्यापुर्वी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीची PDF अर्जदारांना देण्यात आली आहे.
advertisement
बृहन्मुंबई महानगरपालिका, बा.य.ल. नायर धर्मादाय. रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ), एक्स-रे असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट, टेक्निशियन (ई.सी.जी.), ए.आर.सी. कन्सल्टंट आणि ऑर्थोटिक टेक्निशियन व इतर पदांसाठी नोकर भरती केली जात आहे. 30 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर पर्यंत आहे. उमेदवारांना 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत संध्याकाळी 05:30 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने नसणार आहे. अर्जदारांना बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय आणि टो.रा.वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008 या पत्त्यावर अर्ज भरायचा आहे.
advertisement
कोणकोणत्या पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे, याबद्दलची माहिती अर्जदारांना जाहिरात PDF मध्ये पाहायला मिळेल. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय? आणि वयोमर्यादा किती याबद्दलची माहिती तिथे तुम्हाला मिळेल. अर्जाचा नमुना सुद्धा जाहिरातीच्या PDF मध्ये देण्यात आला आहे. अर्ज दाखल करताना, अर्जदारांना अर्जाचे शुल्क कॉलेज इमारत, पहिला मजला, महसूल विभाग (रुम नं. 112) येथे रुपये 790/- + 18% जीएसटी रु.143/- एकूण रु.933/- इतके शुल्क दि. 01.10.2025 ते दि. 10.10.2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शनिवार तसेच रविवार वगळून) सकाळी 11:00 ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत भरुन, त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्जा सोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात दि. 10.10.2025 रोजी संध्याकाळी 05.30 पर्यंत सादर करायचे आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Bharti 2025: 10वी, 12वीच्या तरूणांना मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! 90,000 पर्यंत मिळणार पगार