Mumbai-Ahmedabad Bullet Train : जमीन, डोंगर आणि समुद्रातून धावणार बुलेट ट्रेन, बीकेसी ते शिळफाटा सुसाट, मोठं अपडेट समोर
Last Updated:
KC To Shilphata Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग आला असून लवकरच भूमिगत बोगद्याचे काम सुरू होणार आहे. टनेल बोरिंग मशीन मुंबईत दाखल होत असून बीकेसी ते शिळफाटा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जाणार आहे.
मुंबई : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन हा सर्वात चर्चेत आलेला प्रकल्प आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांचे लक्ष या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकडे लागले असून आता याबाबती एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता सुरु होणार असून यासाठी मुंबईतील भूमिगत भागांसाठी खोदकामही येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे,त्यामुळे योग्य वेळेत बुलेट ट्रेन मुंबईमध्ये सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी या भागाच्या खोदकामासाठी आवश्यक असणारे दोन टनेल बोरिंग मशीन जवाहरलाल नेहरु बंदरात दाखल होणार आहे.
काही बाबींमुळे बुलेट ट्रेनच्या या मुंबईतील खोदकाम सुरु होण्यास उशी झाला मात्र आता तीन महिन्यांत खोदकाम सुरु होईल. बुलेट ट्रेन प्रक्पात वांद्रे-कु्र्ला संकुल ते शिळफाटादरम्याने सुमारे 20.37 किमी मार्ग भुमिगत असणार आहे. याच भागाच्या खोदकामासाठी ही मशीच वापरण्यात येईल. एवढेच नाही तर या मार्गावरील 7 किमीचा बोगदा हा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे.
advertisement
कसा असेल हा मार्ग?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही देशातील सर्वात पहिली बुलेट ट्रेन असणार आहे आणि ती ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे. यात प्रकल्पात मुंबईतील भुयारी बोगदे हे जमीनीखाली 25ते 65 मीटर खोल असतील. तर शिळफाटा परिसरातील असलेल्या पार्सिक डोंगराखाली सुमारे 114 मीटर खोल बोगदा तयार केला जाणार आहे.हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी गरज भासल्यास तिसरी मशीनही वापरण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान एकाच बोगद्यात अप आणि डाऊन असे दोन्ही रेल्वे मार्ग असतील.
advertisement
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग 508 किमीचा असून यातील सूरत ते वापी दरम्यानचा 97 किमीचा टप्पा ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील काळात देशात आणखी 7 बुलेट ट्रेन प्रकल्प राबवण्याची योजना असून त्यात मुंबईपुणे मार्गाचाही समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Ahmedabad Bullet Train : जमीन, डोंगर आणि समुद्रातून धावणार बुलेट ट्रेन, बीकेसी ते शिळफाटा सुसाट, मोठं अपडेट समोर








