advertisement

Mumbai : भायखळ्यात मोठी दुर्घटना! 4 थ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5जण गंभीर जखमी, धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर

Last Updated:

Shocking Video : भायखळ्यातील एखा टॉवरमध्ये लिफ्ट कोसळल्याने पाच जण जखमी झाले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेचे कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

Five Injured After Lift Collapses in Byculla Building
Five Injured After Lift Collapses in Byculla Building
मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात बुधवारी रात्री उशिरा एक गंभीर अपघात घडला. घोडापदेव येथील एका इमारतीतील लिफ्ट अचानक कोसळली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.
भायखळ्यातील सोसायटीत हाहाकार
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलिस, इतर संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तत्काळ बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी तिघांना जेजे रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात आणि एका जखमीला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
advertisement
advertisement
लिफ्ट कोसळण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट
लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली, तांत्रिक बिघाड होता की देखभालीत हलगर्जीपणा झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. लिफ्टची नियमित तपासणी आणि देखभाल योग्य प्रकारे झाली होती का याची चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इमारतींतील लिफ्टच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : भायखळ्यात मोठी दुर्घटना! 4 थ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5जण गंभीर जखमी, धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement