Mumbai Nanded Railway: दिवाळीआधी रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-नांदेडसाठी धावणार विशेष गाड्या, वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Nanded Railway: दसरा दिवाळीच्या काळात मुंबई-नांदेडसाठी विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे याबाबत जाणून घेऊ.
मुंबई: सणासुदीचा काळ जसजसा जवळ येतोय, तसतशी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. दसरा-दिवाळीच्या काळात ही गर्दी आणखी प्रचंड होणार असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. याच अंतर्गत आता मुंबई ते नांदेडदरम्यान 4 विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड यांच्यामध्ये धावणार असून प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक
1) ट्रेन क्रमांक 07604: ही विशेष गाडी 23 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
2) ट्रेन क्रमांक 07603: ही गाडी 22 ते 29 सप्टेंबर 2025 पर्यंत दर सोमवारी रात्री 11.45 वाजता नांदेडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.40 वाजता मुंबईत पोहोचेल.
advertisement
गाड्यांची रचना
1 वातानुकूलित प्रथम, 2 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 6 शयनयान, 4 सामान्य डबे, 2 जनरेटर कार आणि 1 पॅन्ट्री कार अशी सोय करण्यात आली आहे.
थांबे कुठे?
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, परभणी यांसह एकूण 15
advertisement
ठिकाणी गाड्या थांबतील.
आरक्षण कधी सुरू होणार?
view commentsया गाड्यांचे आरक्षण 20 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल. प्रवासी सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर तिकीट बुक करू शकतील. तसेच आरक्षित नसलेल्या डब्यांची तिकिटे UTS अॅपद्वारे घेता येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Nanded Railway: दिवाळीआधी रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-नांदेडसाठी धावणार विशेष गाड्या, वेळापत्रक


