येरे येरे पावसा! मुंबईकरांवर संकट; 7 धरणांमध्ये फक्त 20 टक्केच पाणीसाठा शिल्लक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे. आधीच मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून 10 टक्के पाणी कपात सुरू आहे.
मुंबई, प्रतिनिधी सुष्मिता भदाणे : मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस पडला आणि जवळपास अर्धी मुंबई ठप्प झाली, मात्र त्यानंतर पावसाने जी पाठ फिरवली ती फिरवलीच. त्यामुळे आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात पाणी संकट अजून भीषण होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी धरणक्षेत्रात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे. आधीच मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून 10 टक्के पाणी कपात सुरू आहे. त्यात आता मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 20 टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे जर पाऊस झाला नाही तर येत्या काळात भीषण पाणीसंकट निर्माण होऊ शकतं.
नवी मुंबईत पाणी कपात सुरू असून तीन दिवस पाणी बंद ठेवण्यात येतं. एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. अनेक भागांमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरीसुद्धा पाऊस झाला नाही तर येत्या काही दिवसांत पाण्यासाठी मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
धरणांमध्ये किमान 80% पाणीसाठा झाल्यास पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची तंगती तलवार कायम राहणार आहे. आता धरणक्षेत्रात लवकर पाऊस पडावा असं मुंबईसह उपनगरातील नागरिक प्रार्थना करत आहेत.
दुसरीकडे राज्यात अकोला, वाशिम आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट अजून भीषण होत असताना दिसत आहे. अकोल्यातील महान धरणात 5% जलसाठा वाढला आहे. 6 व्या दिवशी पाणी पुरवठा होणार असून, यापूर्वी पाच दिवसांतून एकदाच नळाला पाणी येत होतं. त्यामुळे तिथेही लोक अनेक समस्यांचा सामना करत आहेत.
advertisement
लातूर जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक गावात पाणी टंचाईचं संकट , अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. वाशिम रिसोड शहरासह 9 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काळात लवकरच भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता पाऊस आला नाही तर होणार असं चिन्हं दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2024 10:52 AM IST