Railway Police: CSMT रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा! तब्बल 30,00,000 रुपये किमतीचा चेक केला परत!

Last Updated:

Inspiring Story: मुंबईतील रेल्वे पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेबाबत सर्वांनाच माहिती आहे. नुकतेच CSMT पोलिसांनी 30 लाख रुपयांचा सही केलेला चेक सापडल्यानंतर तो संबंधिताला परत दिला आहे.

Inspiring Story: CSMT रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा! तब्बल 30,00,000 रुपये किमतीचा चेक केला परत!
Inspiring Story: CSMT रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा! तब्बल 30,00,000 रुपये किमतीचा चेक केला परत!
मुंबई: पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतं. काही वेळा पोलिसांकडून होणाऱ्या गैरप्रकारांची देखील चर्चा होते. परंतु, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे पोलिसांनी प्रामाणिकपणाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. 9 जुलै रोजी कर्तव्यावर असताना सापडलेला तब्बल 30 लाख रुपये किमतीचा सही केलेला चेक आणि पासबुक प्रामाणिकपणे परत केलं आहे. त्यामुळे रमेश टाकळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सीएसएमटी लोकल लाईन रेल्वे स्टेशन  येथे कर्तव्यावर असताना 9 जुलै रोजी रमेश टाकळकर यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे पासबुक आणि तब्बल 30 लाख रुपये किमतीचा सही केलेला चेक सापडला. टाकळकर यांनी लगेच पासबुक आणि चेक पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्यासमोर हजर केला. तेव्हा पोलीस निरीक्षक सचिन गवते यांनी चेक आणि पासबुक यांवरील माहितीच्या आधारे पासबुकधारकाचा शोध घेतला.
advertisement
सदर चेक आणि पासबुक सौरभ राजू शेट्टे या व्यावसायिकाचे असल्याचे समजले. तेव्हा त्याला फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. तसेच खात्री करून 30 लाख रुपये किमतीचा चेक आणि पासबुक परत करण्यात आले. रेल्वे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कर्तव्य प्रामाणिकता दाखवत तत्परतेने चेक आणि पासबुक परत केले. त्यामुळे सौरभ शेट्टे यांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच सर्वसामान्यांकडूनही पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Police: CSMT रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा! तब्बल 30,00,000 रुपये किमतीचा चेक केला परत!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement